चॉपरने मारहाण करुन लुटायचे, वांद्रे आणि खार पोलिसांकडून तिघांना अटक

मुंबईतील खार परिसरात चॉपरने मारहाण करुन लोकांना लुटणाऱ्या तिघांना अटक (Three Accused Arrested In Case Of Robbery) खार पोलीस आणि वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.

चॉपरने मारहाण करुन लुटायचे, वांद्रे आणि खार पोलिसांकडून तिघांना अटक
Crime News
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 6:45 AM

मुंबई : मुंबईतील खार परिसरात चॉपरने मारहाण करुन लोकांना लुटणाऱ्या तिघांना अटक (Three Accused Arrested In Case Of Robbery) खार पोलीस आणि वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला चॉपर जप्त करण्यात आला आहे (Maharashtra Crime News Three Accused Arrested In Case Of Robbery And Threatening By Chopper In Khar Mumbai).

मंगळवारी (9 मार्च) पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास खार येथील कार्टर रोड परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका 33 वर्षीय व्यक्तीला या चोरट्यांनी चॉपरचा धाक दाखवत लुटले, त्याला जखमीही केले आणि त्याच्याकडून मोबाईल आणि हेडफोन लुटले. या चोरट्यांनी व्यक्तीच्या मदतीसाठी आलेल्या दोन महिलांनाही धमकावून त्यांचा मोबाईल चोरणयाचा प्रयत्न केला मात्र ते यात अयशस्वी ठरले.

यानंतर ते तिनही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रात्रपाळी गस्तीवरील असलेल्या खार आणि वांद्रे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले तर तिसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याला खार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिवाजीनगर येथील बैंगवाडी येथून सायंकाळी ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींकडून नमूद गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला चॉपर हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी वर नमूद गुन्हा करण्यापूर्वी घाटकोपर येथे एका ट्रक ड्रायव्हरलाही चाॅपरचा धाक दाखवून त्याचा मोबाइल आणि रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलेला आहे. या तिघांवरही पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस तीनही आरोपी यांच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत.

Maharashtra Crime News Three Accused Arrested In Case Of Robbery And Threatening By Chopper In Khar Mumbai

संबंधित बातम्या :

नागपुरात लष्कराच्या निवृत्त जवानाच्या घरी शस्त्र आढळल्याने खळबळ, जवानाला अटक

घरगुती वादातून अघोरी कृत्य, विधवा महिलेसह मुलींना मारहाण, एकीचा कान कापला

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.