पिंपरी-चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे फेसबुक अकाऊण्ट हॅक, मित्रांकडे पैशांची मागणी
पिंपरी-चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे (Senior Police Inspectors Facebook Account Hacked) फेसबुक अकाऊण्ट हॅक करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे (Senior Police Inspectors Facebook Account Hacked) फेसबुक अकाऊण्ट हॅक करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांचा फोटो वापरुन हुबेहूब तसेच अकाऊण्ट तयार करण्यात आले आहेत (Maharashtra Crime News Wakad Police Station Senior Police Inspectors Facebook Account Hacked In Pimpari-Chinchwad).
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नावाचा फायदा घेत हॅकर ने फ्रेंडलिस्टमधील मित्राकडे पैशाची अवास्तव मागणीही केली. तसेच, फ्रेंडलिस्ट मधील अनेकांना या हॅकरने 21 हजार, 10 हजार, 15 हजार रुपयांची मागणी केली आहे. त्यानंतर या मित्रांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांना फोन करुन याबाबत विचारणा केली असता ही घटना उघडकीस आली.
हिंदी भाषेत पैशांची मागणीवरुन संशय
हे बनावट अकाऊण्ट बनवणाऱ्या व्यक्तीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमधील काहीजणांना फोन करुन पैशांची मागणी केली ही मागणी या व्यक्तीने हिंदीमध्ये केल्याने फेसबुक फ्रेंड लिस्टमधील मित्रांना संशय आला. त्यानंतर संबंधित फेसबुक फ्रेंड वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्याशी संपर्क केला असता त्वरित मुगळीकर यांनी ही माहिती सायबर विभागाला दिली आणि ते खाते त्वरित ब्लॉक केले.
फेसबूक सर्विस प्रोव्हायडरला देखील तक्रार करण्यात आली असून अशा फेक अकाऊण्टवरुन जर पैशाची मागणी केली तर नजीकच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याचा आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी केले आहे.
यापूर्वीही पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील अनेक अधिकाऱ्यांची खाती ही हॅक झाल्याचं समोर आलं आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांची बनावट फेसबुक खाती तयार करुन पैशांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हे हॅकर पिंपरी-चिंचवडमधील पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष करत असल्याचं चित्र आहे.
पुण्यातल्या सीआयडी कार्यालयातून 4 UPS चोरीला, सफाई कामगारानेच चोरी केल्याचे उघडhttps://t.co/0fiICmcH4S#CIDoffice #Pune #Theft #Police
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2021
Maharashtra Crime News Wakad Police Station Senior Police Inspectors Facebook Account Hacked In Pimpari-Chinchwad
संबंधित बातम्या :
पुण्यात कोरोना नियमांचे ऐशीतैशी, रात्री उशिरापर्यंत पब सुरुच, अनेक तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल