Video : कल्याणमध्ये बिल्डरच्या ऑफिसवर हल्ला, लाकडी दंडुक्यांनी काचा फोडल्या
कल्याणमधील एका बिल्डरच्या ऑफिसवर हल्ल्याचा प्रकार घडला. बिल्डर संजय गायकवाड यांच्या गौरी विनायक डेव्हलपर्स या कार्यालयावर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला.
कल्याण : कल्याणमधील एका बिल्डरच्या ऑफिसवर हल्ल्याचा प्रकार घडला. बिल्डर संजय गायकवाड यांच्या गौरी विनायक डेव्हलपर्स या कार्यालयावर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला.
कार्यालयाबाहेर असलेला सुरक्षारक्षकाला हल्लेखोरांनी धक्काबुक्की केली. कार्यालयाच्या काचा फोडल्या. हे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सदर हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत आहे.
“दोन ते तीन लोक हातात लाकडी दंडुके घेऊन आले. त्यांनी ऑफिसबाहेरील काचा फोडल्या. आरोपी सीसीटीव्हीत कैद झालेत. संबंधितांनी असा प्रकार का केला असावा, नेमकं काय कारण असावं, याचा शोध घेतला जात” असल्याचं कोळसेवाडी पोलिसांनी सांगितलं.
हे ही वाचा :
पतीचे दुसर्या महिलेशी प्रेमसंबंध, पत्नीला राग अनावर; आधी गोळी मारली मग शरीराचे केले तुकडे
अफगाणिस्तान : कंदहारच्या शिया मशिदीत 3 साखळी स्फोट, हल्ल्यात 32 जण ठार झाल्याची माहिती