Farmer Death | ऊसाच्या शेतातील आग विझवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे घडली आहे. संजय एकनाथ चौधरी असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे.
नंदुरबार : आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू (Farmer Death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले. नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) बामखेडा येथे हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. शेतकरी संजय एकनाथ चौधरी आपल्या ऊसाच्या शेतात लागलेली आग विझवण्यासाठी गेले होते, मात्र आगीत होरपळल्याने (Fire) त्यांना जीव गमवावा लागला. विजेच्या तारांची ठिणगी पडल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे घडली आहे. संजय एकनाथ चौधरी असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी संध्याकाळी चौधरी यांच्या ऊसाच्या शेताला आग लागली होती. त्या शेजारीच गव्हाचे क्षेत्र होते. ही आग गव्हाच्या शेतात लागू नये, यासाठी संजय चौधरी हे आग विझवण्यासाठी गेले. आग विझवतांना चौधरीही आगीच्या ज्वाळांमधे सापडले. या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संजय चौधरींच्या अपघाती निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजेच्या तारांची ठिणगी पडून आग
विजेच्या तारांची ठिणगी पडल्याने ही आग लागल्याची माहिती आहे. सारंगखेडा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत नोंद करण्यात आलेली आहे. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे संजय चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
ही रोषणाई नाही! कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर भीषण वणवा, पीकांसह फळंही खाक
आगीशी खेळणं दोन तरुणांच्या आलं अंगलट, स्वागत यात्रेत दोन तरुण भाजले
वाशिममध्ये पाच एकर जंगल जळून खाक, विद्यार्थ्यांनी विझविली आग