Maharashtra Crime : जिथे तोडफोड तिथेच काढली धिंड, नाशिक-पुण्यात समाजकंटकांचे धाबे दणाणले !

हल्ली परिसरात आपली दहशत माजवण्यासाठी जाळपोळ, तोडफोड, हत्यार दाखवणे या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र पोलिसांनी आता अॅक्शन मोडमध्ये येत गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

Maharashtra Crime : जिथे तोडफोड तिथेच काढली धिंड, नाशिक-पुण्यात समाजकंटकांचे धाबे दणाणले !
जिथे तोडफोड तिथेच धिंडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 10:19 AM

चंदन पुजाधिकारी / प्रदीप कापसे, मुंबई / 26 जुलै 2023 : नाशिक-पुण्यात सध्या टोळक्याने हैदोस घातला आहे. हातात कोयता घेऊन दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणे या घटनांनी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि जिथे गुन्हेगारांनी दहशत माजवण्याचे प्रकार केले, तेथेच पोलिसांनी त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत. या कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नाशिकमध्ये सलग दोन गाड्यांची तोडफोड

नाशिकरोड आणि विहितगाव येथे चारचाकी, दुचाकी गाड्या जाळल्याची आणि फोडल्याची घटना सलग दोन दिवस घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत समाजकंटकांची परिसरातून धिंड काढली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विहितगाव आणि धोंगडेनगर येथे भर पावसात या संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली.

पुण्यातही आरोपींची धिंड काढत भररस्त्यात चोपले

पुण्यात दोन दिवसापूर्वी सिंहगड रोड परिसरात हॉटेलची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर पुण्यातील हवेली पोलिसांनीही अॅक्शन मोडमध्ये येत गुन्हेगारांची धिंड काढली. जिथं तोडफोड केली तिथंच पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली. तसेच भर रस्त्यातच गुन्हेगारांना चोपही दिला. वैभव इक्कर आणि चेतन चोरघे अशी दोघा गुन्हेगाराची नावे आहेत. या कामगिरीबद्दल हवेली पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.