खोटं जॉयनिंग लेटर, खोटं ट्रेनिंग, नंतर फोन स्विच ऑफ, शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सरकारी नोकरी किंवा खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देतो, असं सांगून लाखो रुपयांनी गंडवणाऱ्या एका टोळीचा महाराष्ट्र पोलिसांनी भंडाफोड केला आहे (Maharashtra Police busted a big racket who cheated through job lure).

खोटं जॉयनिंग लेटर, खोटं ट्रेनिंग, नंतर फोन स्विच ऑफ, शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
महाराष्ट्र पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी, 9 राज्यातील शेकडो तरुणांना नोकरीच्या नावाने गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 7:54 PM

नांदेड : सरकारी नोकरी किंवा खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देतो, असं सांगून लाखो रुपयांनी गंडवणाऱ्या एका टोळीचा महाराष्ट्र पोलिसांनी भंडाफोड केला आहे. विशेष म्हणजे संबंधित टोळी ही तब्बल 9 राज्यांमध्ये कार्यरत होती. या टोळीने 9 राज्यांमध्ये आतापर्यंत शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांनी लुबाडलं आहे. या टोळीतील आरोपी हे तरुणांना इतकं फसवायचे की, ते ट्रेनिंगचाही बनाव करायचे. याशिवाय ते खोटं जॉयनिंग लेटर द्यायचे. अनेक तरुण ट्रेनिंगला लागल्यानंतर नोकरीला लावल्यानिमित्ताने लाखो रुपये या टोळीला द्यायचे. पण नंतर त्यांना आपण फसवलो गेलो, याची जाणीव व्हायची. अखेर पोलिसांनी या टोळीतील 7 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे  पोलिसांनी या सातही आरोपींना विविध राज्यांमधून अटक केली आहे (Maharashtra Police busted a big racket who cheated through job lure).

पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?

हिंगोली जिल्ह्यातील वसमत पोलीस स्थानकात नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हिंगोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता या रॅकेटची व्याप्ती देशातील अनेक राज्यात पसरली असल्याचे समोर आलं. ही टोळी नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना हेरायची. या तरुणांना रेल्वे, मुंबई महापालिका, एफसीआय, सीआयएसएफ अशा ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवले जायचे. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यातील अनेकांना या टोळीने आपल्या जाळ्यात ओढले होते (Maharashtra Police busted a big racket who cheated through job lure).

तरुणांची फसवणूक कशी केली जायची?

तरुणांना खरं पटावं यासाठी तरुणांचं काही ठिकाणी बनावट ट्रेनिंग घेतलं जायचं. ट्रेनिंग होत असल्याने विश्वासाने शेकडो तरुणांनी त्यांना पैसे दिले. नोकरीचे बनावट ऑर्डर दिल्या जायच्या. मूळ नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर मात्र आपली फसवणूक झाल्याचे उघड व्हायचे. फसवणूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी नांदेड, मुंबई, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि दिल्ली येथून अटक  केली. त्यांच्याकडून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आतापर्यंत 25 जणांच्या तक्रारी

पोलिसांकडे आतापर्यंत फसवणूक झालेल्या 25 जणांनी तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणाची व्यापती मोठी असून फसवणूक झालेल्या सर्वांनी वसमत पोलीस किंवा हिंगोली पोलीसांकडे तक्रार करण्याचे आवाहन नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.

हेही वाचा : अविनाश भोसलेंची तब्बल 40 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.