Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

पोलिसांनी शुक्रवारी बाळ बोठे याच्या घरावर धाड टाकली. यावेळी घरातून शस्त्र जप्त करण्यात आले. | Rekha jare murder case

रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 9:05 PM

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे (Bal Bothe)  याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. बाळ बोठे हे देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून विमान प्राधिकरणालाही सूचना देण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी पोलिसांनी शुक्रवारी बाळ बोठे याच्या घरावर धाड टाकली. यावेळी घरातून शस्त्र जप्त करण्यात आले. मात्र, बाळ बोठे याच्याकडे या शस्त्राचा परवाना असल्याचे समजते. (Lookout notice against Bal Bothe accused in Rekha jare murder case)

रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत मारेकऱ्यांना पकडले होते. मारेकऱ्यांची चौकशी केली असता पत्रकार बाळासाहेब बोठे यानेच 6 लाख रुपये देऊन रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बाळ बोठे फरार झाला होता.

कोण आहे बाळ बोठे?

बाळासाहेब बोठे कोण आहे याबाबतची चर्चा अहमनगरसह राज्यात होत आहे. बाळासाहेब बोठे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याने राज्यातील नावाजलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार, मुख्य बातमीदार, राजकीय संपादक आणि निवासी संपादक अशा विविध पदांवर काम केलं आहे. याशिवाय काही फिचर वेबसाईटसाठीही त्याने लिखाण केलं आहे.

पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला आहे. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी देखील बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. त्याच्या ‘राजकारण आणि माध्यमं’ या पुस्तकाचाही एम. ए. अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात संदर्भग्रंथ म्हणून समावेश आहे. हेच पुस्तक यावर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या राजकीय पत्रकारिता विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून निवडले गेले आहे.

नेमकं प्रकरण काय?

रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

संबंधित बातम्या :

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

(Lookout notice against Bal Bothe accused in Rekha jare murder case)

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.