Electric Shock | इलेक्ट्रिक पोलवर विजेचा धक्का, रत्नागिरीत वायरमनचा जागीच मृत्यू, विजेच्या खांबावर भयावह दृश्य
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात ओणी कोंडीवळे येथे इलेक्ट्रिक पोलवर काम करत असताना विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू झाला. या घटनेने कोणी गावावर शोककळा पसरली आहे
रत्नागिरी : इलेक्ट्रिक पोलवर काम करत असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागून एका वायरमनचा मृत्यू (Wireman Death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात राजापूर तालुक्यात ओणी कोंडीवळे येथे हा प्रकार घडला. मुंबई गोवा महामार्गावर ओणी येथे पेट्रोल पंपाच्या समोरील महावितरणच्या डीपीवर दुरुस्तीचे काम करत असताना ही घटना घडली. वायरमन प्रकाश बाबू गमरे (वय 52 वर्ष, रा. ओणी) या वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात ओणी कोंडीवळे येथे इलेक्ट्रिक पोलवर काम करत असताना विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू झाला. या घटनेने कोणी गावावर शोककळा पसरली आहे.
सुट्टीच्या दिवशीही कामावर
गमरे यांची रविवारी सुट्टी असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कामावर बोलवले होते सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ओणी पेट्रोल पंपा समोरील महावितरणच्या डीपीवर दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना जोराचा शॉक लागला.
भयावह दृश्य
विजेचा धक्का लागून ते जागीच गतप्राण झाले. आग लागलेल्या अवस्थेत ते डीपीला लटकत होते. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
संबंधित बातम्या :
चार्जिंगला फोन लावून बायकोशी गप्पा, 25 वर्षीय मुंबईकर तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
पंढरपुरात विजेचा शॉक लागून दोघांचा जीव गेला! अख्खा गाव शोकसागरात, तर 2 मुलांचं छत्र हरपलं
आंघोळीनंतर नदीकिनारी बसलेल्या तिघांवर काळ कोसळला, विजेची तार पडून जागीच गतप्राण