Virar Accident | भरधाव रिक्षा उलटली, पहाटे चार वाजता अपघाताचा थरार, 15 वर्षांचा मुलगा ठार
पहाटेच्या सुमारास रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. किशन यशवंत दाभाडे (वय 15 वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे.
विरार : विरारमध्ये पहाटेच्या सुमारास रिक्षाचा भीषण अपघात (Rickshaw Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. किशन यशवंत दाभाडे (वय 15 वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. आज (गुरुवारी) पहाटे 4 वाजताच्या सुमारास रिक्षा चालक आणि मुलगा CNG भरुन विरार पूर्व (Virar) भागातील नाना नानी पार्क रस्त्यावर आले, त्यावेळी हा अपघात घडला आहे. स्थनिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रिक्षा चालक हा भरधाव वेगाने रिक्षा चालवत आला होता. यावेळी चालकाचे नियंत्र सुटल्याने रिक्षा पलटी होऊन हा अपघात झाला आहे.
पहाटेच्या सुमारास रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. किशन यशवंत दाभाडे (वय 15 वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास रिक्षा चालक आणि मुलगा सीएनजी भरुन विरार पूर्व भागातील नाना नानी पार्क रस्त्यावर आले होते. त्यावेळी रिक्षा चालक हा भरधाव वेगाने रिक्षा चालवत आला होता. यावेळी चालकाचे नियंत्र सुटल्याने रिक्षा पलटी होऊन हा अपघात झाला आहे.
रिक्षा चालकाच्या बाजूला बसलेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. किशन यशवंत दाभाडे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. तर चालकही किरकोळ जखमी झाला आहे. विरार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
Goa | जळगावहून मित्रांसोबत गोव्याला, लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा बुडून मृत्यू
सिलिंग कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दाम्पत्यासह दोन मुलं गंभीर
CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान