‘विशाल गवळीला तळोजात पाठवू नका, तिथे त्याचा ‘आका’…,’ महेश गायकवाड यांचा टोला
आका आणि त्याचा मोठा आका हे शब्द सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात परवलीचे बनले आहेत. कल्याण येथील बलात्कारातून हत्येच्या प्रकरणातही या 'आका' शब्दाची पेरणी राजकीय हेवेदाव्यासाठी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपी विशाल गवळी याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण पूर्वेला स्थानाक परिसरात आरोपी विशाल गवळी याला फाशीच्या मागणीसाठी सह्यांची मोहिम घेण्यात आली. त्यावेळी ‘आका’ आपआपसातील उणीदुणी काढण्यासाठी ‘आका’ शब्दावरुन टोमणेबाजी झाली आहे. एरव्ही हिंदीत वापरला जाणारा ‘आका’हा शब्द सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत आहे. आता कल्याण अत्याचार प्रकरणातही त्याचा अशा पद्धतीने उल्लेख झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कल्याणचे शिवसेना नेते महेश गायकवाड आणि सध्या तुरुंगात असलेले भाजपा नेते गणपत गायकवाड यांचे वैर जगजाहीर आहे. याच महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गणपत गायकवाड यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. महेश गायकवाड या हल्ल्यात मृत्यूशी यशस्वी झुंज देऊन बचावले. या घटनेला आता आता एक वर्ष होत आले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणाची चर्चा महेश गायकवाड यांच्या एका वक्तव्याने पुन्हा सुरु झाली. काय झाले नेमके पाहा…
कल्याण येथील अवघ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन तिची हत्याकरीत तिच्या मृतदेह पत्नीच्या मदतीने रिक्षातून फेकणाऱ्या नराधम विशाल गवळी आणि त्याच्या पत्नी विशाल गवळी यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात नराधम विशाल गवळी याला फाशी द्यावी किंवा त्याचे एन्काऊंटर करावे अशी मागणी कल्याण पू्र्वेतील नागरिकांनी कल्याण स्थानक परिसरात सह्यांची मोहीम राबवून केली आहे.
महेश गायकवाड यांचा ‘आका’ वरुन टोला !
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अपहरण लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे तातडीने फाशी देण्यात द्यावी किंवा त्याचा एन्काऊंटर करावे या मागणीसाठी कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांनी शनिवारी सह्यांची मोहीम राबवली. यावेळी शेकडो नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेत स्वाक्षऱ्या केल्या. आरोपीला फाशी किंवा त्याचा एन्काऊंटर करा यासाठी ही सह्यांची मोहीम राबवण्यात येत असल्याचे शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी सांगितले. आरोपी विशाल गवळीला आधारवाडी तुरुंगात पाठवावे तळोजा तुरुंगात त्यांचा ‘आका’ आहे, त्यामुळे तिथे पाठवू नका असा टोला आमदार गणपत गायकवाड यांचे नाव घेता महेश गायकवाड यांनी लगावला .