Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV Video : नोएडात कारचे बोनेट धडकल्याचा राग, चौघांनी महिंद्रा थार फोडली, घटना सीसीटीव्हीत कैद

सदर पांढरी गाडी ही आरोपींनी भाड्याने घेतली होती. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे. चौघा आरोपींची अद्याप ओळख पटली नाही. सध्या पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेतले आहे.

CCTV Video : नोएडात कारचे बोनेट धडकल्याचा राग, चौघांनी महिंद्रा थार फोडली, घटना सीसीटीव्हीत कैद
नोएडात कारचे बोनेट धडकल्याचा राग, चौघांनी महिंद्रा थार फोडलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 9:16 PM

दिल्ली : पुढील कार थांबल्यामुळे मागून येणाऱ्या कारने अचानक ब्रेक दाबला आणि यात कारचे बोनेट पुढच्या कारला हलके धडकले. या कारणातून मागच्या कारमधील चौघांनी लोखंडी रॉडने पुढील महिंद्रा थार (Mahindra Thar) फोडल्याची घटना ग्रेटर नोएडातील दादरीमध्ये घडली आहे. तोडफोड (Vandalised) केल्यानंतर हे चौघेही फरार झाले आहेत. महिंद्रा थारमधील प्रवासी तात्काळ गाडीतून उतरुन पळून गेल्याने सुखरुप बचावले आहेत. ही सर्व घटना रोडवरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे.

काय आहे घटना ?

दादरी परिसरातील जीटी रोडवर एका चौकातून महिंद्रा थार ही कार चालली होती. चौक असल्यामुळे गाड्यांची सतत रेलचेल सुरु होती. या कारच्या पुढील चाललेली एक कार पुढे जाईपर्यंत ही महिंद्रा थार थांबली. यावेळी महिंद्रा थार थांबल्यामुळे मागून येणाऱ्या एका पांढऱ्या कारला अचानक ब्रेक मारावा लागल्याने त्या कारचे बोनेट हलकेसे महिंद्रा कारला धडकले. यामुळे पांढऱ्या कारमधील संतापलेल्या चौघांनी बाहेर येत लोखंडी रॉडने महिंद्रा थारची तोडफोड सुरु केली. गाडीच्या खिडक्या फोडल्या. यानंतर चौघेही फरार झाले. सुदैवाने महिंद्रा थारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना चौकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कार मालक अटक

सदर पांढरी गाडी ही आरोपींनी भाड्याने घेतली होती. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे. चौघा आरोपींची अद्याप ओळख पटली नाही. सध्या पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेतले आहे. आमीर असे अटक करण्यात आलेल्या कार मालकाचे नाव आहे. (Mahindra Thar car vandalized for minor reasons in Noida, incident captured on CCTV)

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.