दिल्ली : पुढील कार थांबल्यामुळे मागून येणाऱ्या कारने अचानक ब्रेक दाबला आणि यात कारचे बोनेट पुढच्या कारला हलके धडकले. या कारणातून मागच्या कारमधील चौघांनी लोखंडी रॉडने पुढील महिंद्रा थार (Mahindra Thar) फोडल्याची घटना ग्रेटर नोएडातील दादरीमध्ये घडली आहे. तोडफोड (Vandalised) केल्यानंतर हे चौघेही फरार झाले आहेत. महिंद्रा थारमधील प्रवासी तात्काळ गाडीतून उतरुन पळून गेल्याने सुखरुप बचावले आहेत. ही सर्व घटना रोडवरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे.
#Watch | Four men smashed the windows of a car with iron rods in what appears to be a road rage incident in Dadri pic.twitter.com/MGj1Hy7WdE
हे सुद्धा वाचा— The Indian Express (@IndianExpress) July 12, 2022
दादरी परिसरातील जीटी रोडवर एका चौकातून महिंद्रा थार ही कार चालली होती. चौक असल्यामुळे गाड्यांची सतत रेलचेल सुरु होती. या कारच्या पुढील चाललेली एक कार पुढे जाईपर्यंत ही महिंद्रा थार थांबली. यावेळी महिंद्रा थार थांबल्यामुळे मागून येणाऱ्या एका पांढऱ्या कारला अचानक ब्रेक मारावा लागल्याने त्या कारचे बोनेट हलकेसे महिंद्रा कारला धडकले. यामुळे पांढऱ्या कारमधील संतापलेल्या चौघांनी बाहेर येत लोखंडी रॉडने महिंद्रा थारची तोडफोड सुरु केली. गाडीच्या खिडक्या फोडल्या. यानंतर चौघेही फरार झाले. सुदैवाने महिंद्रा थारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना चौकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सदर पांढरी गाडी ही आरोपींनी भाड्याने घेतली होती. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे. चौघा आरोपींची अद्याप ओळख पटली नाही. सध्या पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेतले आहे. आमीर असे अटक करण्यात आलेल्या कार मालकाचे नाव आहे. (Mahindra Thar car vandalized for minor reasons in Noida, incident captured on CCTV)