मुंबई – मागच्या काही दिवसांपासून मालाड (Malad) परिसरात क्राईमच्या अधिक (Crime) घटना घडत आहेत. काल घरकाम करणाऱ्या एका महिलेला इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने (security) इमारतीवरून ढकलून दिले. महिलेचं नशीब चांगलं म्हणून ती या घटनेतून बचावली. अनिता फाले असं त्या महिलेचं नाव आहे. ज्यावेळी महिलेला ढकलण्यात आलं त्यावेळी त्यांनी ग्रील पकडून ठेवल्याने त्यांचा जीव वाचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना घडल्यानंतर काही तासात आरोपीने तिथून पळ काढला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीचे नाव अर्जुन सिंग असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी (Malad Police) एक पथक तयार केलं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी अनिता यांना सुरक्षा रक्षकाने खाली फेकून दिले होते. त्यावेळी त्यांनी शिताफीन अठराव्या मजल्यावर एका खिडकीला घट्ट पकडले होते. ज्यावेळी हा प्रकार तिथल्या एका महिला रहिवाशाच्या लक्षात आला. त्यावेळी त्यांनी पोलिसांना पाचारण केले.
अनिता या गोरेगाव येथील रहिवासी आहेत. त्या मालाड येथील सोसायटीमध्ये घरकाम करतात. तिथेचं अर्जुन हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. गुरुवारी ज्यावेळी अनिता घरकाम करण्यासाठी इमारतीमध्ये दाखल झाल्या. तसेच त्याचं काम करून त्या दुसऱ्या कामावरती निघाल्या होत्या. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना दुसरं काम मिळवून देता असं सांगून विसाव्या मजल्यावर नेलं. तिथं गेल्यानंतर त्यांने अनिता गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनिता यांनी तिथून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना विसाव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. त्यांनी अठराव्या मजल्यावर एका ग्रीलला पकडल्याने त्यांचा जीव वाचला आहे.
हा प्रकार तिथल्या एका रहिवासी महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे गोष्ट तात्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांनी ही घटना अग्नीशमक दलाला दिली. अग्नीशमक दलाने त्या महिलेची तात्काळ सुटका केली. अनिता या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना काल समजा ग्रीलचा आधार मिळाला नसता मोठा अनर्थ घडला असता. पोलिसांना त्यांनी सगळं प्रकरण समजून सांगितलं आहे. पोलिसांनी तिथल्या प्रत्येक घटनेची माहिती घेतली आहे. तसेच पोलिस सुरक्षा रक्षकाचा शोध घेत आहेत. सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतल्यानंतर खरी माहिती बाहेर येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.