पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद ड्रायव्हरने चिरडलं, मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेला पोर्श कार अपघात चांगलाच गाजला. अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडून ठार मारलं. तशीच काहीशी घटना पुण्यात पुन्हा घडली असून पौडफाटा भागात एका टेम्पो चालकाने मनसे पदाधिकारी आणि त्याच्या पत्नीच्या अंगावर गाडी घातली. यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद ड्रायव्हरने चिरडलं, मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 12:04 PM

पुण्यातील कल्याणीनगर येथे काही महिन्यांपूर्वी पोर्श कारचा झालेला अपघात, ते प्रकरण खूप गाजलं. बिल्डरच्या लाडावलेल्या, अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवली आणि बाईकस्वारांना चिरडलं. त्यात दोघांचा मृत्यू झाला. हे प्रकरण अजूनही चर्चेत असतानाच पुण्यातील पौड फाट्याजवळ काल रात्री असाच एक भीषण अपघात झाला. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.  पौडफाट्याजवळ रात्री 11 च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने पीक अप गाडीने 4-5 वाहनांना जबरदस्त धडक दिली. या अपघातामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले तर त्यांची तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला. श्रीकांत अमराळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आशिष पवार  या ड्रायव्हरला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

अपघाताचा थरार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील कोथरून येथील करिश्मा चौकात या ड्रायव्हरने अनेक गाड्यांना धडक दिली. तेथेही काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एवढं होऊनही तो काही थांबला नाही, तो दारूच्या नशेत ट्रक चालवत पुढे गेला आणि अनेक गाड्यांना धडक देत होता. त्यानंतरही त्याने गाडी थांबवलीच नाही तर पुढेच नेली. त्यावेळी तेथे सिग्नलजवळ मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे व त्यांची पत्नी गीतांजली हे उभे होते. आरोपी ड्रायव्हरने दारूच्या नशेत पिकअप ट्रक थेट त्यांच्या अंगावरच चढवला. गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचा हा थरार तेथील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला आणि त्यांनी धाव घेत टेम्पो थांबवून आरोपी ड्रायव्हर आशिष याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अलंकार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.