पूजेसाठी मंडप बांधतानाच जोरात आवाज आला, बीएमडब्ल्यू थेट अंगावरच…

मुंबई पुन्हा एकदा थरारक अपघाताने हादरली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या अनेक घटना घडत असून आता कोस्टल रोडवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये एकाला जीव गमवावा लागला आहे

पूजेसाठी मंडप बांधतानाच जोरात आवाज आला, बीएमडब्ल्यू थेट अंगावरच...
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 8:25 AM

मुंबई पुन्हा एकदा थरारक अपघाताने हादरली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या अनेक घटना घडत असून आता कोस्टल रोडवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये एकाला जीव गमवावा लागला आहे. एका हिरे व्यापाऱ्याच्या बीएमडब्ल्यू कारची धडक बसून कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोस्टल रोड येथे घडली आहे. काश्मीर मिसा सिंह असे मृत इसमाचे नाव असून याप्रकरणी त्याचा सहकारी पिंटुकुमार जातन ठाकूर ( वय 36) याने पोलिसांत धाव घेत फिर्याद नोंदवली. त्यानंतर वरळी पोलिसांनी कारचा मालक आणि हिरे व्यापारी राहिल हिंमाशु मेहता (वय 45) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोस्टल रोडवर घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

कसा घडला अपघात ?

तक्रारदार ठाकूर याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून कोस्टल रोड येथील प्रकल्पस्थळी वेल्डिंगचे काम करण्यात येत आहे. हा प्रकल्प ज्या कंपनीला सोपवण्यात आला आहे, त्या एचसीसी कंपनीने हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जिजामाता नगर येथे निवासाची व्यवस्था केली आहे. मृत इसम काश्मीर मिसा सिंह हा वायरमन असून तो देखील इतर कामगांराप्रमाणे तेथे राहत होता. 16 सप्टेंबर रोडी सर्वजण नेहमीप्रमाणे कामासाठी हजर झाले. 17 सप्टेंबर रोजी तेथे पूजा असल्याने कोस्टल रोडच्या गेट क्रमांक 2 येथील वरळी दूध डेरीसमोर मंडप बांधण्याचे काम सुरू होते. सर्वजण तेथे उभे असताना अचानक मोठ्ठा आवाज आला, ते ऐकून कामगारांनी तेथे धाव घेतली आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले.

उपचारांदरम्यान झाला मृत्यू

कोस्टल रोडच्या साऊथ बाँडच्या दिशेने भरधाव वेगाने एक बीएमडब्ल्यू कार आली होती आणि त्या कारने सिंह याला जोरदार धडक देत उडवले. गाडीची धडक बसल्याने तो जबर जखमी होऊन खाली कोसळला. बराच रक्तस्त्रावही होत होता. आपल्यापैकीच एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच अन्य कामगारांनी तेथे पटक धाव घेतली आणि सिंह याला उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी सिंहच्या अन्य एका सहकाऱ्याने पिंटुकुमार ठाकूर याने वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेला प्रकार कथन करत फिर्याद नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी बीएमडब्ल्यू चालवणारा इसम मेहूल मेहता याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.