अमरावतीत सायबर पोलिसांची मोठी कारवाई, 18 गुन्हे दाखल असलेले आरोपी ताब्यात
अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी वांटेड असून त्यांच्या विरुद्ध सायबरचे विविध गुन्हे दाखल आहेत. ते पोलिसांना चकमा देत फिरत होते, तर अटक करण्यात आलेले आरोपीनी आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली असल्याचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.
अमरावती : ॲमेझॉन (Amazon) या साइटवरून ऑनलाईन नळाची खरेदी अमरावतीमधील (Amravati) एका इसमाने केली होती. मात्र यात इसमाची फसवणूक झाली आहे. ऑनलाइन व्यवहार करताना त्याच्या बँक खात्यातून ८ लाख ६१ हजार रुपये चोरट्यांनी शिताफीने काढून घेतले आहेत. अमरावती सायबर क्राईम पोलिसांनी सखोल तपास करत झारखंड येथे जाऊन दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही आंतरराज्य टोळी असून त्यांच्याविरुद्ध 8 राज्यात सायबर क्राईमचे 18 गुन्हे दाखल आहेत. अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी वांटेड असून त्यांच्या विरुद्ध सायबरचे विविध गुन्हे दाखल आहेत. ते पोलिसांना चकमा देत फिरत होते, तर अटक करण्यात आलेले आरोपीनी आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली असल्याचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. आरोपींना ३ दिवसाची पोलीस (Amravati police) कोठडी सुनावली आहे.
ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी झाल्याचा अपघाताचा व्हिडिओ…
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर जैनपूर येथे सुरू होते. मात्र शिबीराचा समारोप झाल्यानंतर चक्क विद्यार्थ्यांना एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसवून दर्यापूर येथून घेऊन निघाले असतांना वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी झाली. त्यामध्ये २२विद्यार्थी जखमी झाले, मात्र या ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी झाल्याचा अपघाताचा व्हिडिओ हाती लागला आहे. अगदी वळण रस्त्यावर हा ट्रॅक्टर वेगाने जात असतांना ट्रॅक्टर पलटी झाला आहे. सध्या अपघातातील दोघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रवासी ऑटोला लटकलेले पाहायला मिळाले
अमरावतीच्या दर्यापूरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या अपघातानंतर अमरावती जिल्ह्यातील अवैध वाहतुकीचा प्रश्नाने पुन्हा एकदा डोकेवरती काढले आहे. मेळघाटमध्ये जीव धोक्यात टाकून सर्रास प्रवाशांची अवैध वाहतुक सुरू आहे. काही दिवसांपूर्वीचा धारणी शहरातील एका मॅजिक ऑटोतीन अवैध वाहतुकीचा व्हिडिओ समोर आला होता. विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून हे प्रवासी ऑटोला लटकलेले पाहायला मिळाले.