महिलेला अश्लील व्हिडिओ कॉल करणारा तरुण गजाआड, आरोपीच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

आरोपीची चौकशी केली असता त्याने तक्रारदार महिलेशिवाय 25 ते 30 महिलांना विविध नंबरवरुन व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आणि अश्लील मेसेज पाठवल्याचे सांगितले.

महिलेला अश्लील व्हिडिओ कॉल करणारा तरुण गजाआड, आरोपीच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या
महिलांना अश्लील मॅसेज पाठवणारा आरोपी गजाआडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 10:01 AM

मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : व्हॉट्सअॅपवर महिलांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या एका नराधमाला मुंबईच्या मालाड पोलिसांनी अटक केली आहे. एवढेच नाही तर तो व्हिडिओ कॉल करून महिलांसोबत अश्लील कृत्यही करायचा. पीडित महिलेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेत त्याला पुण्यातील इंदोरी भागातून बेड्या ठोकल्या आहेत. योतीराम बाबूराव मन्सूळे असे अटक केलेल्या 27 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात कलम 66/23 IPC 354 D, 509 r/w IT Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.

महिलांना अश्लील फोटो आणि मॅसेज पाठवायचा

आरोपी महिलांना अश्लील व्हॉट्सअपवर अश्लील फोटो आणि मॅसेज पाठवायचा. मग व्हिडिओ कॉल करुन अश्लील कृत्यही करायचा. याबाबत मालाड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला.

पुण्यात सापळा रचून आरोपीला अटक

तपासादरम्यान आरोपी पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुण्यातील इंदोरी भागात सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने तक्रारदार महिलेशिवाय 25 ते 30 महिलांना विविध नंबरवरुन व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आणि अश्लील मेसेज पाठवल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

अप्पर पोलीस आयुक्त उ.प्रा.वि. राजीव जैन, पोलीस उप आयुक्त अजयकुमार बंसल, सहायक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पोलीस ठाणे सायबर सेल पथकाचे पोउनि धिरज वायकोस, पोलीस शिपाई तौसीफ शेख, पोलीस शिपाई जयंत भरारे यांनी यांनी ही कारवाई केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.