मालेगाव ( नाशिक ) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत येत असते. आताही पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते म्हणजे मालेगाव न्यायालयात ( Malegaon Court ) एक अनोखा निकाल देण्यात आला आहे. दहा वर्षापूर्वी मारहाण प्रकरणाची नुकतीच सुनावणी पार पडली आहे. त्यामध्ये न्यायाधीशांनी एका आरोपीला सुनावलेली शिक्षा चर्चेचा विषय ( Nashik News ) ठरत आहे. कदाचित पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी शिक्षा सुनावली गेली आहे. सलग 21 दिवस दररोज दोन झाडांचं वृक्षारोपण, दिवसातून पाच वेळा नमाज पठण करण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे संपूर्ण मालेगावमध्येच नाही संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयानं 2010 मध्ये एका प्रकरणात 30 वर्षीय मुस्लिम तरुणाला ही शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये सलग 21 दररोज दोन झाडे लावणे आणि दिवसातून पाच वेळा नमाज पठन करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मशीदीच्या परिसरात हे झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंघ संधू यांनी रौफ खान याला दोषी ठरविले होते आणि त्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मालेगावमधील मोहम्मद शरीफ शेख यांनी कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये 2010 मध्ये तक्रार दिली होती. त्यावेळी त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी गेले असताना गाडी पार्क केली होती. त्यावेळी रौफ खान यांनी रिक्षाने गाडीला धक्का दिला होता.
माझ्या घरासमोर गाडी का पार्क केली अशी विचारणा करत रौफ खान यांनी मारहाण केली होतीळ त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चार साक्षीदारांचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर आरोपी सुधारण्यासाठी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
त्यामध्ये रौफ खान यानं आयुष्यभर नमाज पडेल असे सांगत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले होते. त्यामुळे या शिक्षेची मालेगावच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे.