71 फ्रिज आणि 11 टीव्ही फोडले… मालकाचा बदला घेण्यासाठी हैदोस !

मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची मॉल ऑपरेटरने सॅलरी वाढवली नाही, म्हणून चिडलेल्या कर्मचाऱ्याने गोंधळ घातला. त्याने मॉलमध्ये ठेवलेले 11 टीव्ही आणि 71 फ्रीजच तोडून टाकले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.

71 फ्रिज आणि 11 टीव्ही फोडले... मालकाचा बदला घेण्यासाठी हैदोस !
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 10:32 AM

मध्य प्रदेशमधील बैतूलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथे शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या मालकाचा बदला घेण्यासाठी सामानाचीच तोडफोड केली. त्याने 1-2 नव्हे तब्बल 18 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक सामानाची नासधूस केली. सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. तो कर्मचारी शॉपिंग मॉलच्या इलेक्ट्रॉनिक सेक्शनमधील डिस्प्लेवर ठेवलेल्या एलईडी टीव्ही आणि फ्रीजची तोडफोड करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

आरोपी कर्मचारी कमल पवारने टीव्ही-फ्रीज फोडत त्यांची नासधूस केली. त्याने 11 टीव्हींची स्क्रीन फोडली. त्यानंतर तो फ्रीजच्या सेक्शनमध्ये गेला आणि तेथील 71 फ्रीजवर तडाखे मारत ते खराब केले. मॉलमधील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. हैदोस घालत नुकसान करण्याचं काम बाहेरील कोणी नव्हे तर मॉलच्या कर्मचाऱ्यानेच केल्याचे पाहून सर्वच जण हैराण झाले.

मानसिक स्थिती ठीक नाही

मिळालेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याने दिवाळीत मॉल संचालकाकडे पगार वाढवण्याची मागणी केली होती. मात्र त्याची मागणी काही पूर्ण झाली नाही, पगार वाढलाच नाही. त्यानंतर रागावलेल्या कर्मचाऱ्याने तीन दिवसांची सुट्टी घेतली. कामावर परत आल्यानंतरही तो रागाने धुमसतच होता. त्याच रागाच्या भरात त्याने सामानाची तोडफोड केली. या घटनेनंतर मॉलचा मॅनेजर संजय गुप्ता याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. मॉलमधील मालाचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती, मात्र आरोपीने मानसिक स्थितीचे कारण देत जामीन मिळवला. आता पोलीस पुढील कारवाईत व्यस्त आहेत.

18 लाखांचे नुकसान

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आणि मॉल ऑपरेटरने या घटनेची तक्रार केल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली, असे याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं. आमचाच कर्मचारी असं काही करू शकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं मॉलचे संचालक संजय गुप्ता यांनी सांगितलं. खराब झालेल्या टीव्ही आणि फ्रीजची विक्री कशी करावी असा प्रश्न आता त्यांच्या समोर आहे. यामध्ये सुमारे 18 लाखांचे नुकसान झाले आहे.

धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.