काठी, पाईप , सळ्या… जे हातात येईन त्याने बदडलं, लग्नमंडप बनला आखाडा; शेवटी पोलिस आले अन्

या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींचा पोलिस कसून शोध घेत असून लवकरच त्यांना बेड्या ठोकण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र हा हल्ला नेमका का केला, मारहाणीच कारण काय ? हे अद्याप स्पष्टपणे समजू शकलेलं नाही.

काठी, पाईप , सळ्या... जे हातात येईन त्याने बदडलं, लग्नमंडप बनला आखाडा;  शेवटी पोलिस आले अन्
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 8:42 AM

लग्नसमारंभात सहसा ढोल ताशे वाजतात, कधी शहनाईचे सूर घुमतात.. पण मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये लग्नमंडपा हा आखाडा बनल्याचे दिसून आले. छोट्याशा कारणावरून दोन गटात झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले आणि एकच खळबळ उडाली. उज्जैनमधील घाटिया पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात शनिवारी रात्री एका लग्न समारंभात दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादामुळे विरुद्ध पक्षाच्या लोकांनी मंडपातील लाईट घालवले बंद केले. आणि समोरच्या लोकांवर लाठ्या, काठ्या, पाईप आणि इतर शस्त्रांनी अमानुष हल्ला केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. हल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घाटिया पोलिस स्टेशनचे प्रभारी राधेश्याम चौहान यांनी सांगितले की, शनिवारी रात्री एक लग्नसोहळा सुरू होता. जवळच्या राजुखेडी गावात राहणारे राजाराम हे त्यांची चार मुले कमल, प्रकाश, मोहन आणि अरुण यांच्यासोबत लग्नासाठी गेले होते. मात्र त्याच सोहळ्यादरम्यान जवळच्या गावात राहणारे त्यांचे नातेवाईक रमेश, जीवन, जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांशी वाद झाला. बघता बघता हा वाद चांगलाच पेटला आणि रमेश यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मिळून समारंभातील वीज घातवली आणि राजाराम व त्याच्या मुलांवर काठ्या, पाईप व रॉडने पद्धतशीरपणे हल्ला केला. यावेळी लग्नसमारंभात एकच गोंधळ झाला, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या हल्ल्यात राजाराम व त्यांचा मुलगा जखमी झाले तर हल्ला करून आरोप तेथून लागलीच फरार झाले.

तीन जण गंभीर जखमी

गावात लग्नादरम्यान हल्ला व मारामारी झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र हल्लेखोरांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही .

आरोपींचा कसून शोध सुरू

पोलिस आरोपींचा कसून शोध घेत असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे घाटिया पोलीस ठाण्याचे प्रभारी राधेश्याम चौहान म्हणाले. मात्र अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

जखमींवर उपचार सुरू

या घटनेत राजाराम आणि कमल, प्रकाश, मोहन आणि अरुण या त्यांच्या मुलावर अमानुष हल्ला करण्यात आला. त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजाराम आणि त्यांच्या मुलांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हल्ल्यामुळे एकच गोंधळ

लग्नात अचानक झालेला हा वाद आणि हल्ल्यामुळे सगळेच घाबरले. हा हल्ला का झाला हे तर कोणालाच कळले नाही. राजाराम आणि त्यांच्या कुटुंबीयांना एवढ्या निर्दयीपणे का मारहाण करण्यात आली? या वादाचे कारण काय ? याचा पोलिस कसून तपास करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.