Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवा लखोबा लोखंडे, नकली दवाखाना आणि भाड्याच्या नर्स, 15 महिलांना लग्नाचं आमिष दाखवून असे फसवले

आपली फसगत झाल्याचे कळल्यानंतरही या महिलांनी आपल्या बदनामीच्या भीतीने महेश विरोधात कधीही तक्रार दाखल केली नाही. त्याचा फायदा घेत त्यांनी पंधरा जणींना फसवले,

नवा लखोबा लोखंडे, नकली दवाखाना आणि भाड्याच्या नर्स, 15 महिलांना लग्नाचं आमिष दाखवून असे फसवले
weddingImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 8:55 PM

नवी दिल्ली : आचार्य अत्रे लिखित आणि प्रभाकर पणशीकर यांचे लोकप्रिय नाटक ‘तो मी नव्हेच’ मधील लखोबा लोखंडे पैदा झाला आहे. या तरुणाने कधी इंजिनिअर तर कधी डॉक्टर ( Doctor ) बनून सुमारे पंधरा महिलांशी लग्न करुन त्यांना फसविल्याचे उघडकीस आले आहे. या महाठकाने मेट्रीमोनियल साईटव्दारे ( Matrimonial Sites ) तरुणींना लग्नाचे आमीष दाखविल्याचे उघडकीस आले आहे. साल 2014 पासून लखबो लोखंडे याने पंधरा तरुणींना फशी पाडत लग्न करुन फसविले आहे.

35 वर्षीय महेशचे प्रोफाईल पाहून अनेक सुशिक्षित तरुणी सहज त्याच्या जाळ्यात ओढल्या गेल्या. त्याने मैट्रीमोनियल साईटवर स्वत:चे प्रोफाईल बेमालूमपणे तयार केले.  साल 2014 पासून त्याने या पंधरा तरुणींना फशी पाडत लग्न करुन फसविले होते. म्हैसूर पोलिसांनी महेश के.बी.नायक याला अखेर अटक झाली, म्हैसूर येथील एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी खास पथक नेमले. त्यानंतर त्याला टुमाकुरु येथून पोलीसांनी शनिवारी अटक केल्यानंतर त्याचे बिंग फुटले.

मैट्रीमोनियल साईटवरुन फसवणूक

महेश आतापर्यंत पंधरा महिलांशी विवाह केला असून त्याला चार मुलेही आहेत. आणखी एका महिलेने त्याला संपर्क केला होता. तेवढ्यातच त्याला जेरबंद केले. महेशने मैट्रीमोनियल साईट तयार केली होती. त्यावर प्रोफाईलमध्ये तो कधी स्वत:ला इंजिनिअर तर कधी डॉक्टर असल्याचे तरूणींना भासवायचा. त्याने डॉक्टराचा अभिनय करण्यासाठी टुमाकुरू येथे नकली दवाखाना उभारला होता आणि त्यात भाड्याने नर्स देखील नेमल्या होत्या अशी माहीती उघडकीस आली आहे.

इंग्रजी ऐकताच प्रस्ताव भेटाळला 

महेश याचे कामचलाऊ इंग्रजी ऐकताच अनेक महिलांना संशय आल्याने अनेकींनी त्याचा लग्नाचा प्रस्तावच फेटाळला. आंध्रप्रदेशातील एका म्हैसूर येथील एका महिलेने जानेवारी 2023 मध्ये महेश याने क्लिनिक उभारण्यासाठी पैशाचा तगादा लावायचा. जेव्हा त्या पैसे द्यायच्या नाही तेव्हा तो त्यांचे दागिने घेऊन पसार व्हायचा.  महेश खूपच कमी वेळा त्याच्या बायकांना भेटायला गेला. त्याच्या सर्व बायका या उच्च शिक्षित आणि व्यावसायिक असून स्वत:च्या पायांवर उभ्या आहेत. त्यामुळे महेश याच्या आर्थिक मदतीची त्यांना अजिबात गरज नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आपली फसगत झाल्याचे कळल्यानंतरही त्यांनी बदनामीच्या भीतीने महेश विरोधात कधीही तक्रार दाखल केली नाही.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.