30 रुपयांचा वाद… पेटला आणि त्याने जीव गमावला, मित्रच ठरला काळ !

मुंबई शहरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून छोट्या-मोठ्या कारणासाठी लोक एकमेकांचा जीव घ्यायलाही पुढेमागे बघत नाहीत. गेल्या आठवड्यात दर स्टेशनवर एका सूटकेसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. मूकबधिर मित्रांनीच त्यांच्या एका मित्राचा खून केला होता. आता मुंबईत तशीच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 30 रुपयांसाठी एका इसमाला त्याचा अमूल्य जीव गमवावा लागला

30 रुपयांचा वाद... पेटला आणि त्याने जीव गमावला, मित्रच ठरला काळ !
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 11:44 AM

मुंबई शहरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून छोट्या-मोठ्या कारणासाठी लोक एकमेकांचा जीव घ्यायलाही पुढेमागे बघत नाहीत. गेल्या आठवड्यात दर स्टेशनवर एका सूटकेसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. मूकबधिर मित्रांनीच त्यांच्या एका मित्राचा खून केला होता. आता मुंबईत तशीच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 30 रुपयांसाठी एका इसमाला त्याचा अमूल्य जीव गमवावा लागला आहे. हो , हे खरं आहे. रिक्षाचं भाडं देण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला आणि एक मित्रच दुसऱ्या मित्राच्या जीवावर उठला. त्याने मित्राला जबर मारहाण केली आणि त्याला तसाच जखमी अवस्थेत मरायला टाकून तो पळून गेला. पहाटेच्या सुमारास इतर लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या जखमी इसमाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं खरं, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होती. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.

चक्कन अली असे मृत समाचे नाव असून तो 29 वर्षांचा आहे. तर सैफ जहिद अली असे मारेकरी आरोपीचे नाव असून मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला कल्याण रेल्वे स्टेशनमधून अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

रिक्षाचं भाडं देण्यावरून झालेला वाद जीवावर बेतला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे कुर्ला येथील पॅलेस रेसिडन्सी बार बाहेर एका इसमाचा मृतदेह सापडला होता. चक्कन अअली असे त्याचे नाव होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, संशयाची सुई त्याचा मित्र सैफ याच्याकडे वळली. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत होते. तो तडकाफडकी उत्तर प्रदेशातील त्याच्या गोंडा या गावी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर मुंबई गुन्हे शाकेच्या कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सैफ याला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली.

चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी सैफ आणि मृत इसम चक्कन (वय 29) हे दोघेही मित्र होते. रविवारी रात्री ते धारावीतून कुर्ल्याला रिक्षाने आले. रिक्षाचं भाडं 30 रुपये झालं. मात्र ते पैसे कोणी द्यायचे यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. बघता बघता तो वाद खूप वाढला आणि टोकाला गेला. त्याच भांडणादरम्यान रागाच्या भरात सैफने चक्कनला मारहाण केली, तो गंभीर जखमी झाला. मात्र त्याला तशाच अवस्थेत टाकून सैफ तिथून पसार झाला. पहाटेच्या सुमारास काही लोकांनी त्याला जखमी अवस्थे पाहिलं आणि उपचारांसाठी रुग्णालयात नेलं पण तेथे डॉक्टरांन तपासून त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी आरोपी सैफविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आस्ून पोलिस अधिक तपास करत आहेत.

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.