तुझा व्हिडीओ व्हायरल करेन, धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 53 वर्षांच्या नराधमास अटक

मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून आई-वडील कामाला गेल्याचे पाहून आजोबांनी त्यांच्याच अल्पवयीन नातीवर महिनाभर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजीच आहे. यामुळे एकच खळबळ माजली होती.

तुझा व्हिडीओ व्हायरल करेन, धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 53 वर्षांच्या नराधमास अटक
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 10:44 AM

मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून आई-वडील कामाला गेल्याचे पाहून आजोबांनी त्यांच्याच अल्पवयीन नातीवर महिनाभर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजीच आहे. यामुळे मुंबईत एकच खळबळ माजली होती. हा दुर्दैवी प्रकार नुकताच उघडकीस आलेला असतानाच आता मुंबईतील अंधेरी भागात अशीच एक आणखी दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रासोबत तुझा व्हिडीओ पालकांना दाखवेन, तो व्हायरल करेन अशी धमकी देत एका 53 वर्षांच्या नराधमाने अवघ्या 14 वर्षांच्या मुलीला त्याच्या वासनेची शिकार बनवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झालं आहे.

याप्रकरणी डी.एन. नगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या आधारे अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपीसह वॉच ठेवणाऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी अवघी 14 वर्षांची असून ती मुंबईत आई-वडिलांसह राहते. आरोपी हा 53 वर्षांचा असून तो तिचा परिचितच आहे. त्याने त्या मुलीला एका तरूणासोबत मैत्री करण्यास प्रवृत्त केलं. मात्र त्यानंतर त्याच्यासोबत त्या मुलीचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ तुझ्या आई-वडिलांना दाखवेन, सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. आणि त्याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने ही माहिती मालकांना देताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी अखेर डी. एन. नगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. अत्याचार करणारा आरोपी आणि मुलीवर वॉच ठेवणारा दुसरा आरोपी अशा दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

हे सुद्धा वाचा

अमरावतीमध्ये शाळेत शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग

अमरावतीच्या शिंदी बुजरुक गावातही एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील शाळेत शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला असून गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघड झाली आहे.

पथ्रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदी येथील खासगी संस्थेच्या शाळेतील प्रकार आहे. विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची दुर्दैवी घटना उघड झाल्यानंतर गावकरी आक्रमक झाले असून संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकाची कार तोडफोड करत कार उलटवली . तसेच हजारो गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतली, तेव्हा स्वत:ला वाचवण्यासाठी शिक्षकाने शाळेत कोंडून घेतले होते . शाळेच्या आवारात गावकरी गेल्यानंतर शिक्षकाला आमच्या ताब्यात द्या ही मागणी केल्यानंतर तणाव निर्माण झाला होता.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.