विश्वासाने त्याच्या घरी गेली, पण त्याच्या मनात भलतंच होतं, नंतर जे घडलं त्याने अख्ख शहरच हादरलं; तिला न्याय मिळेल ?
एका महिलेला फसवून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आणि तिचा अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : राजधानी दिल्लीतील गुन्हेगारीच्या (crime news) घटनांना आळा बसत नाहीये. उत्तर दिल्लीतील तिमारपूर परिसरात एका महिलेचे लैंगिक शोषण करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ (obscene videos) काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपी हा दिल्ली परिवहन महामंडळामध्ये (DTC) बस कंडक्टर म्हणून कार्यरत असल्याचे समजते. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, आरोपीने पीडित महिलेला अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. पीडित महिला ही 2010 ते 2017 या काळात दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (DTC) मध्ये टायपिस्ट म्हणून कार्यरत होती. मात्र बाळ झाल्यानंतर तिने काम थांबवले होते.
बनवला अश्लील व्हिडीओ
तिमारपूर येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दोन वर्षांपूर्वी ती या भागात आली, तेव्हा तिची आरोपीशी ओळख झाली, असे पोलिसांना तिने सांगितले. एके दिवशी आरोपी हा प्रसाद घेऊन तिच्या घरी आला आणि डीटीसीमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो असे सांगितले. त्यानंतर आरोपीने तिला कोल्डड्रिंकही दिले आणि काही डॉक्युमेंट्स आणण्यास सांगितले. पीडित महिला खोतूनत ते डॉक्युमेंट्स घेऊन आली त्यानंतर तिने ते कोल्डड्रिंक आणि प्रसाद या दोन्हींचे सेवन केले आणि ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने तिचा गैरफायदा घेत तिचे लैंगिक शोषण केले आणि तिचे अश्लील फोटो काढले तसेच न्यूड व्हिडीओही बनवला.
ब्लॅकमेल करून केले शोषण
त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला ते फोटो आणि व्हिडीओ दाखवत ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली आणि वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या काही मित्रांनीही महिलेचे शोषण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. यामध्ये आणखी चार ते पाच लोकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत.