सोनं, हिऱ्याच्या दागिन्यांची दिली ऑर्डर, पण बदल्यात दिलं नकली सोनं; व्यापाऱ्याने कोट्यवधींना लुटलं

दक्षिण मुंबईतील एका सोने व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अन्य एका व्यापाऱ्यानेच त्याला फसवल्याचे समोर आले आहे . हिरे आणि सोन्याचे दागिने तयार करून घेतले आणि त्याबदल्यात व्यापाऱ्याने त्या व्यावसायिकाल नकली सोनं दिलं.

सोनं, हिऱ्याच्या दागिन्यांची दिली ऑर्डर, पण बदल्यात दिलं नकली सोनं; व्यापाऱ्याने कोट्यवधींना लुटलं
gold crime
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 8:40 AM

दक्षिण मुंबईतील एका सोने व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अन्य एका व्यापाऱ्यानेच त्याला फसवल्याचे समोर आले आहे . हिरे आणि सोन्याचे दागिने तयार करून घेतले आणि त्याबदल्यात व्यापाऱ्याने त्या व्यावसायिकाल नकली सोनं दिल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणात एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पीडित व्यावसायिकाने दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्यात केली आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.

नेमकं काय झालं ?

पीडित हिरे व्यावसायिकाची ऑपेरा हाऊस परिसरात अंकुर जैन नावाच्या व्यापाऱ्याशी ओळख झाली. तेव्हा अंकुर याने त्या व्यावसायिकाला सोन्याचे, हिऱ्याचे दागिने बनवून देण्याची ऑर्डर दिली. त्या दागिन्यांच्या बदल्यात अंकुर याने सुरूवातीला नियमित पैसे दिले. मात्र नंतर काही दिवसांनी तो पैशांऐवजी, त्या व्यावसायिकाला सोन्याची लगड देऊ लागला. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीत अंकुर याने सुमारे एक कोटीचे दागिने बनवून घेतले आणि त्या बदल्यात तितक्याच किमतीच्या सोन्याच्या लगडी दिल्या. नंतर पैसे देऊन या लगडी सोडवणार असल्याचे अंकुर याने सांगितले होते.

काही दिवसांनी त्या व्यावसायिकाला पैशांची गरज होती, तेव्हा त्याने अंकुरशी संपर्क साधवा आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र नंतर देतो, असे म्हणत अंकुरने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर त्या व्यावसायिकाने त्याला मिळालेल्या सोन्याची लगड वितळवण्यास सुरूवात केली. मात्र ते सोनं नकली असल्याचं पाहून त्याला धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यावसायिकाने दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.