मेट्रोमध्ये अल्पवयीन मुलीसमोरच अश्लील कृत्य, संतापलेल्या प्रवाशांनी आरोपीला शिकवला धडा, पकडून थेट…

मेट्रोचा प्रवास हा सुरक्षित आणि वेगवान समजला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमध्ये घडणाऱ्या घटना पाहून सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. कधी कोणी जीव द्यायचा प्रयत्न करतं तर कोणी व्यक्ती अश्लील चाळे करतो. अशीच एक नुकतीच समोर आली असून असे कृत्य करणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी थेट..

मेट्रोमध्ये अल्पवयीन मुलीसमोरच अश्लील कृत्य, संतापलेल्या प्रवाशांनी आरोपीला शिकवला धडा, पकडून थेट...
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 5:17 PM

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : राजधानी दिल्लीतील मेट्रोचा (delhi metro) प्रवास हा सतत चर्चेतच असतो. तेथे आत्तापर्यंत अनेक अतरंगी तर काही वेळा मान खाली घालायला लावणाऱ्या घटना घडल्या आहे. पण त्या रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश मिळालेले नाही. मेट्रोत अनेक जण अतरंगी चाळे करतात, तर कोणी अश्लील कृत्य करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. अशीच एक धक्कादायक आणि किळसवाणी घटना मेट्रोत पुन्हा घडली. ते पाहून आजूबाजूचे प्रवासी तर हैराणच झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोचा प्रवास सुरू असताना एका इसमाने एका अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य (obscene act) केले. ते पाहून संतापलेल्या प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अल्पवयीन समोरच केले अश्लील चाळे

ही घटना दिल्ली मेट्रोच्या रेड लाइनवर घडली. देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त बुधवारी मेट्रो खचाखच भरली होती. त्यातून सर्वच वयोगटातील लोक प्रवास करत होते. काही जण कुटुंबियांसह नातेवाईकांकडे निघाले होते. त्यातच आरोपी इसम एका अल्पवयीन मुलीच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने अश्लील कृत्य (हस्तमैथुन) करण्यास सुरूवात केली. त्या इसमाचे हे किळसवाणं कृत्य त्या मुलीच्या आईनेही पाहिले आणि त्या दोघी खूपच घाबरल्या. त्या तातडीने सीलमपूर स्टेशनवर उतरल्या.

प्रवाशांनी शिकवला धडा

त्याचे हे कृत्य मेट्रोतील इतर प्रवाशांनीही पाहिले आणि ते संतापले. त्यांनी हे अश्लील कृत्य करणाऱ्या इसमाला पकडले आणि शाहदरा स्टेशवर उतरून त्याला मेट्रो अधिकाऱ्याच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पश्चिम बंगाल येथून दिल्लीला आला होता. पोलिस तेथे पोहोचेपर्यंत मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्याला तेथेच पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.