15 हजार पोस्टमॉर्टेम केले, पण असं कधीच पाहिलं नाही, डॉक्टरही हैराण, तरूणाने असं काय गिळलं?

छत्तीसगडमधील अंबिकापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे एका 35 वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला . त्याच्या मृत्यूचे कारण सुरूवातील कोणालाच समजलं नाही, पण पोस्टमॉर्टम केल्यावर जे रिपोर्ट समोर आले ते वाचून डॉक्टर आणि पोलिस दोघेही हैराण झाले

15 हजार पोस्टमॉर्टेम केले, पण असं कधीच पाहिलं नाही, डॉक्टरही हैराण, तरूणाने असं काय गिळलं?
15 हजार पोस्टमॉर्टेम केले, पण असं कधीच पाहिलं नाही, डॉक्टरही हैराण, तरूणाने असं काय गिळलं? Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 3:20 PM

छत्तीसगडमधील अंबिकापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे एका 35 वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला . त्याच्या मृत्यूचे कारण सुरूवातील कोणालाच समजलं नाही, पण पोस्टमॉर्टम केल्यावर जे रिपोर्ट समोर आले ते वाचून डॉक्टर आणि पोलिस दोघेही हैराण झाले. असं काय होत त्या रिपोर्टमध्ये ?

खरंतर त्या 35 वर्षांच्या इसमाचा श्वास अडकून मृत्यू झाला होता, आणि त्यामागचं कारण होतं एक छोटंस कोंबडीच पिल्लू… वाचून हैराण झालात ना ? पण हे खरं आहे. त्याने चक्क कोबंडीचं छोटं पिल्लू जिवंत गिळलं होतं, आणि त्यामुळे घुसमटून त्याचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिकापुर जिल्ह्यातील दरिमा ठाणे क्षेत्रातील छींदकलो येथे हा अजब-गजब मृत्यू झाला आहे. आनंद असे मृत इसमाचे नाव आहे. कुटुंबियांच्या सांगण्यानुसार, अंघोळ केल्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. त्याला तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं, मात्र तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुरूवातील डॉक्टरांनाच काय कोणालही त्याच्या मृत्यूचं कारण काही कळेना. मात्र अखेर पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा त्याच्या गळ्याच्या जवळ चीर देण्यात आली. तिथे जे सापडलं ते पाहून सर्वजण हैराण झाले. त्याच्या घशात चक्क 20 सेंटीमीटर लांबीचं एक छोटंसं पिल्लू अडकलं होत.

गिळलं जिवंत पिल्लू

त्याने चक्क एक जिवंत पिल्लू गिळलं होतं. त्याचा एक भाग श्वासनलिकेत तर दुसरा भाग अन्न नलिकेत अडकला होता. मी आतापर्यंत 15हजार मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केलंय, पण अशी विचित्र घटना मी पहिल्यांदाच पाहिली आहे, असं शवविच्छेदन करणारे डॉक्टर संतू बाग यांनी सांगितलं. आनंद यादव यांना मूलबाळ नव्हतं, मूल होण्यासाठीच त्यांनी तंत्र-मंत्र किंवा जादूटोण्यामुळे हे पाऊल उचलले असावे, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

गावकरी आणि कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार आनंद सामान्य जीवन जगत होता. पण ही दुर्दैवी घटना त्यांच्यासाठीही आश्चर्यचकित करणारी आहे. जिवंत पिल्लू गिळताना गुदमरल्याने आनंदचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे मत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.