रोज पत्नीच्या जेवणात मिसळायचा ड्रग्स, नंतर दुसऱ्या पुरूषांना बोलावून…, १० वर्ष सुरू होते अत्याचार, नराधम पतीला अखेर अटक
आरोपीने हे सर्व प्रकार रेकॉर्ड करून ते फुटेज त्याने सेव्हही केले होते. पोलिसांनी ते सर्व फुटेज जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व पीडित महिलेचे लग्न होऊन 50 हून अधिक वर्ष झाली असून त्यांना तीन मुलंही आहेत.
Crime News : पती-पत्नीचं नातं हे जन्मजन्मांतरीचं मानलं जातं. आपला जोडीदार आपल्याला सात जन्म मिळावा अशी अनेकांची इच्छा असते. मात्र याच नवरा-बायकोच्या नात्याला काळिमा फसणारी घटना घडली आहे. नराधम पती (husband gave drugs to wife) त्याच्या बायकोच्या जेवणात रोज रात्री अंमली पदार्थ मिसळायचा आण ती बेशुद्ध झाल्यानंतर दुसऱ्या पुरुषांना तिच्यावर अत्याचार करण्यासाठी बोलवायचा, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
द टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, फ्रान्समध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला असून हैराण करणारी बाब म्हणजे त्या दुर्दैवी पीडित महिलेला या प्रकाराबद्दल काहीच माहिती नव्हती आणि हे लाजिरवाणे कृत्य तिच्यासोबत 10 वर्ष सुरू होते.
रिपोर्टनुसार, याप्रकरणी (26 ते 73 वर्ष वयोगटातील) आत्तापर्यंत 51 पुरुषांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस आणखी आरोपींचा शोध घेत असून त्यामध्ये एक फायरमॅन, एक लॉरी ड्रायव्हर, बँक कर्मचारी, जेल गार्ड, एक नर्स आणि पत्रकार यांचाही समावेश असल्याचे समजते.
पत्नीच्या जेवणात मिसळायचा अंमली पदार्थ
मिळालेल्या माहितीनुसार, डॉमिनीक असे आरोपीचे नाव असून तो रोज रात्री त्याच्या पत्नीच्या जेवणात अँटी- अँक्झायटी ड्रग मिसळत असे. पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपी ‘तथाकथित पाहुण्यांना’ फ्रान्समधील आपल्या घरी आमंत्रित करून पत्नीसह शारीरिक संबंध ठेवण्यास उद्युकत करत असे. 2011 ते 2020 या कालावधीत बलात्कार झाले आणि बहुतांश पुरूष त्याच्या घरी अनेक वेळेस परत आले.
ते कृत्य करत असे रेकॉर्ड
आरोपी डॉमिनीक हा इतका नीच होता की तो ही सर्व (अत्याचाराची) कृत्य रेकॉर्डही करत असे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याने हे सर्व फूटेज यूएसबी ड्राइव्ह वर‘ABUSES’ नावाच्या फाईलमध्ये सेव्हही केले होते. पोलिसांनी ते सर्व फुटेज जप्त केले आहे. आरोपी व पीडित महिलेचे लग्न होऊन 50 हून अधिक वर्ष झाली असून त्यांना तीन मुलंही आहेत.
अन्य पुरुषांशी कसा साधला संपर्क ?
टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, आरोपी हा एका इंटरनेट प्लॅटफॉर्मद्वारे इतर पुरुषांच्या संपर्कात आला होता. तेथील मेंबर्स हे अनोळखी आणि संमती न घेतलेल्या पार्टनरसोबत ( ज्यांना बहुतांश वेळे अंली पदार्थ दिले जातात) लैंगिक कृत्यं करण्याबद्दल चर्चा करतात. अशा ठिकाणी आरोपीची इतर पुरुषांशी ओळख झाल्याचे समजते.
पकडले जाऊ नये म्हणून अशी लढवली शक्कल
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इसमाने इतर पुरुषांना तंबाखू किंवा अत्तर यांचा वापर करण्यास बंदी केली होती, कारण त्या वासांमुळे त्याच्या पत्नीला जाग येऊ शकत होती. तापमानातील अचानक होणाऱ्या बदलापासून वाचण्यासाठी तो घरी आलेल्या पुरुषांना गरम पाण्याने हात धुण्यास सांगायचा. बाथरूमध्ये कपडे राहू नयेत यासाठी तो त्या पुरुषांना स्वयंपाकघरातच कपडे उतरवायला सांगायचा. तसेच आपल्या या कृत्याचा शेजारच्यांना संशय येऊ नये यासाठी तो घरी येणाऱ्या लोकांना त्यांची कार एका शाळेजवळ पार्क करायला सांगून अंधारातच घरी यायला लावायचा.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लोकांपैकी काहींनी असा दावा केला की, त्याच्या पत्नीची या कृत्याला संमती नव्हती हे त्यांना माहीतच नव्हते. तर एका आरोपीने हा बलात्कार असल्याचेही सरळ नाकाकले.
असा उघडकीस आला गुन्हा
चेंजिंग रूममध्ये महिलांचे रेकॉर्डिंग करण्यासाठी छुपे कॅमेरे वापरल्याच्या आरोपाखाली आरोपी या आरोपी (डॉमिनीक) विरुद्ध 2020 मध्ये प्राथमिक तपास करत असताना पोलिसांना अत्याचारांच्या या व्हिडिओची माहिती मिळाली.
जेव्हा पीडित महिलेला या व्हिडिओ टेपबद्दल सांगण्यात आले तेव्हा ती उद्धवस्त झाली आणि डिप्रेशनमध्ये गेली. नंतर या महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.