लग्नपत्रिका नव्हे ही तर आफतच.. नाराज मित्र वराच्या घरी शिरला आणि रागाच्या भरात…
गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लग्नाचे निमंत्रण न मिळाल्याने संतापलेल्या तरुणाने दारूच्या नशेत होणाऱ्या घर गाठले. शिवीगाळ झाली आणि रागाच्या भरात...

एखाद्याचं लग्न ठरलं की नातेवाईकांपेक्षा वधू-वरांचे मित्र जास्त आनंदी असतात. मात्र उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. तेथे लग्न ठरलेल्या एका तरूणाने, त्याच्या मित्राला मित्राला लग्नाची पत्रिका न दिल्याने तो नाराज झाला. त्याच रागाच्या भरात तो खूप दारू प्यायला आणि थेट नवऱ्या मुलाच्या घरीच येऊन धडकला. तेव्हा तिथे हळदीचा सोहळा सुरू होता. मात्र दारू पिऊन आलेल्या त्या मित्राने थेट त्या लग्नघरीच हंगामा केला, गोंधळ माजवला आणि त्यानंतर वराचे वडील चांगलेच संतापले. पण त्या मित्राने केलेल्या एका कृतीमुळे गदारोळ माजला, त्या मित्राने थेट वराच्या वडिलांवरच गोळी झाडली
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ट्रॉनिका सिटीच्या मंडोला भागातील आहे. तेथे राहणाऱ्या दीपांशूचा विवाह 22 मार्च रोजी होणार आहे. लग्नापूर्वी घरात हळदी समारंभ चालू होता. तेवढ्यात दीपांशूचा मित्र वंश त्याच्या काही मित्रांसह तिथे पोहोचला. पण दीपांशू याने वंश आणि तरूण या दोन मित्रांना लग्नाचे निमंत्रण दिलं नव्हतं, त्यामुळे वंश हा खूप नाराज होता अशी माहिती समोर आली आहे.
तिथे काय घडलं ?
दीपांशूच्या म्हणण्यानुसार, वंश लग्नघरी आला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. त्याने जवळपास 12-13 लोकांना सोबत आणले होते. कार्यक्रम सुरू होणार असतानाच दारूच्या नशेत असलेल्या वंश याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पण दीपांशूचे वडील सोनू यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र यादरम्यान वंश आणि त्याचे मित्र आक्रमक झाले आणि त्यांनी हाणामारी सुरू केली. वाद वाढतच गेला आणि संतापाच्या भरात वंशने आपल्या मित्रच्या वडिलांवरच, सोनू यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. ती गोळ त्यांच्या हाताला लागली.
गोळीबारानंतर आरोपी फरार
त्यामुळे एकच गदारोळ माजला, वराचे वडील सोनू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पण हा गोळीबार करणारा वंश आणि तरूण हो दोघेही तिथून लागलीच फरार झाले. या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर टोनिका सिटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपींचा कसून शोध सुरू केला.
दिपांशूने वंशला शिवीगाळ करण्यास मनाई केली होती, परंतु तो सहमत नव्हता आणि त्याच्या साथीदाराने दीपांशूच्या वडिलांवर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून लवकरच आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे एसीपी लोणी सिद्धार्थ गौतम यांनी सांगितले.