उधारीचे पैसे मागताच राग अनावर, गिऱ्हाईकाने उकळता चहा तोंडावर फेकला

चहा प्यायल्यावर उधार बाकी असलेले पैसे मागताच एका माणसाला इतका राग आला की त्याने थेट चहाचा टोपच त्या चहा विक्रेत्याच्या तोंडावर फेकून मारला.

उधारीचे पैसे मागताच राग अनावर, गिऱ्हाईकाने उकळता चहा तोंडावर फेकला
गिऱ्हाईकाने उकळता चहा तोंडावर फेकलाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 8:35 AM

चहा… बहुंताश लोकांचं आवडतं पेयं. अनेकांच्या दिवसाची सुरूवात ही एक कप गरमागरम, वाफाळता चहाच पिऊन होते. तर काही जण दिवसभर चहाचे प्याले रिचवत असतात. आयुष्यात प्रत्येकानेच कधी ना कधी चहाचा आस्वाद घेतलेला असतोच. पण हाच चहा एका इसमासाठी अत्यंत भयानक ठरला. उकळता चहा अंगावर पडल्याने मुंबईत एक इसम गंभीर जखमी झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो चहा काही अपघाताने सांडला नाही तर तो चक्क चेहऱ्यावर फेकण्यात आला होता. गरम चहामुळे होरपळलेल्या इसावर सध्या उपचार सुरू आहेत. अतिशय क्रूर अशा वागणुकीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

चहाच्या उधारीचे पैसै मागताच गिऱ्हाईक भडकला

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काळाचौकी परिसरात हा अत्यंत क्रूर आणि तितकाच भीषण प्रकार घडला आहे. चहाच्या उधारीचे पैसै मागताच गिऱ्हाईकाचा राग अनावर झाला आणि त्याने चहा विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना घडली. संतापलेल्या ग्राहकाने चहा टोप उटलून तोच थेट चहा विक्रेत्याच्या तोंडावर मारला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. उकळता चहा अंगावर पडल्याने तो विक्रेता भाजला असून टोप जोरात तोंडावर लागल्याने त्याला दुखापतही झाली आहे, असे समजते. दुकानात ग्राहकांची चहा घेण्यासाठी गर्दी होती. त्याचवेळी चहा विक्रेता आणि ग्राहकाचं काही बोलणं सुरू होतं. त्यांच्यात काही वाद झाला आणि अचानक त्या ग्राहकाने समोरचा चहाचा टोप उचलला आणि त्या विक्रेत्याच्या तोंडावर दाणकन मारला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....