चार वर्ष लिव्ह-इनमध्ये होते, अचानक असं काय झालं की त्याने रचला भयाक कट ? पार्टनर अन् तिच्या लेकीला थेट…
पतीच्या मृत्यूनंतर एक महिला दुसऱ्या इसमासोबत चार वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये रहात होती. मात्र अचानक असं काय झालं की त्याने टोकाचं पाऊल उचललं ?
पाटणा | 26 ऑगस्ट 2023 : एका महिलेसोबत लिव्ह-इनमध्ये (live in relation) राहिल्यानंतर असं काही झालं की त्या नराधमाने त्याची पार्टनर आणि तिच्या निरागस मुलीचं आयुष्यचं (crime news) संपवलं. बिहारमधील बांका येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. रुबैदा अस मृत महिलेचे नाव असून पती निधनानंतर ती जोडीदाराच्या शोधात होती. त्यानंतर तिची इर्शाद सोबत भेट झाली अन् ते दोघे लिव्हइनमध्ये राहू लागले.
4 वर्षे सगळं काही ठीक होतं. इर्शाद, रुबैदा आणि तिची लेक आनंदाने एकत्र राहत होते. मात्र चार वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर असे काही घडले की इर्शादने दोघांची हत्या केली. दुसरं लग्न करण्याच्या नादात त्याने रुबैदासह तिच्या लेकीचाही जीव घेतला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. याप्रकरणी इर्शाद अन्सारी व त्याचे आजोबा रेजिन यांना अटक पोलिसांनी केली. त्यासह तीन दिवसांच्या आतच वेगवेगळ्या ठिकाणांहून मृतदेह शोधून पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.
बांका जिल्ह्यातील बंधुआ कुरावा पोलीस स्टेशन हद्दीतील मतवाला टेकडीजवळील झाडीतून सहा वर्षांच्या अर्धमेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, पोलिसांनी उपचार करूनही त्या मुलीचा अखेर भागलपूरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर त्या आधारे पोलिसांनी ऑटोचालक इर्शाद अन्सारी याला अटक केली. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने लहान मुलगी आणि तिच्या आईचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृत महिला रुबैदा खातून हिचा मृतदेहही कुजलेल्या अवस्थेत सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडामध्ये इर्शादचे आजोबा रेजिन यांचाही समावेश होता. रुबैदा खातून हित्या पहिल्या पतीचे चार वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर इर्शाद व रुबैदा यांची ओळख झाली व ते लिव्ह-इनमध्ये राहू लागले. तिची मुलगीही त्यांच्यासोबत रहात होती. मात्र इर्शादचे लग्न दुसऱ्या तरूणीशी व्हावे अशी त्याच्या आजोबांची इच्छा होती. पण रुबैदाचा या गोष्टीला विरोध होता. अखेर तिचा अडथळा दूर करण्यासाठी इर्शाद व त्याच्या आजोबांनी २२ ऑगस्ट रोजी रुबैदा व तिच्या मुलीची हत्या केली. आणि मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.