Mumbai Crime : लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येने शहर पुन्हा हादरलं ! एका तक्रारीमुळे तिला गमवावा लागला जीव…

वसई परिसरातील रहिवासी असलेल्या आरोपीने ऑगस्ट महिन्यातच ही हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. अखेर आज त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai Crime : लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येने शहर पुन्हा हादरलं ! एका तक्रारीमुळे तिला गमवावा लागला जीव...
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 12:58 PM

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : मीरारोड येथील मनोज साने याने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची क्रूरपणे हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पालघरमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. तेथे राहणाऱ्या एका 43 वर्षीय इसमाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचा (man killed live in partner) जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. तिने त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर त्याने हे कृत्य केल्याचे समजते. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान ही हत्या केली असून २८ वर्षीय महिलेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

या हत्याकांडामुळे मीरारोड येथील हत्याकांडाच्या भयानक आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. आरोपी हा पालघरमधील वसई येथील रहिवासी असून मंगळवारी त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती वसईच्या सहाय्यक पोलिस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली.

कसा उघडकीस आला गुन्हा ?

मृत महिला हरवली असवल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी 14 ऑगस्ट रोजी नायगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरू केला असता, हा गुन्हा उघडकीस आल्याचे समजते. आरोपीने तिची हत्या केल्यानंतर गुजरातमधील वापी येथे मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी, अशी शंकादेखील पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपी इसम व पीडित महिला लिव्ह-इन मध्ये रहात होते. मात्र काही दिवसांपूर्वीच पीडित महिलेने त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आरोपी संतापला होता. त्याने तिला ही तक्रार मागे घेण्यासही सांगितले. मात्र महिलेने तक्रार मागे घेण्यास नकार दिला आणि त्याच रागातून आरोपीने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्या आधारे आरोपीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पीडितेच्या बहिणीच्या तक्रारीनंतर नायगाव पोलिसांनी सोमवारी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) आणि 201 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तसेच आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल असल्याचे समजते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.