दोन दिवसांपासून प्रेयसीशी वाद, शेवटी घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या, चंद्रपूर हादरलं

रागाच्या भरात प्रियकराने एका विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागभीड शहरात घडली आहे. विवेक चौधरी (25) असं आरोपीचे नाव असून त्याच्या 28 वर्षीय प्रेयसीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे.

दोन दिवसांपासून प्रेयसीशी वाद, शेवटी घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या, चंद्रपूर हादरलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 9:34 PM

चंद्रपूर : रागाच्या भरात प्रियकराने एका विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागभीड शहरात घडली आहे. विवेक चौधरी (25) असं आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या 28 वर्षीय प्रेयसीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. मृत महिला तिच्या नवऱ्यापासून वेगळी आपल्या माहेरी राहत होती. आरोपी विवेक चौधरी याने महिलेच्या घरात शिरुन हे कृत्य केले आहे. (man killed married woman due to clash in Nagbhid city of Chandrapur district)

आरोपीचा महिलेवर धारधार शस्त्राने हल्ला 

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विवेक चौधरी आणि मृत महिला यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. अनेकवेळा चर्चा करुनही हा वाद मिटत नव्हता. आज (14 ऑगस्ट) या वादाने टोकाचे रुप धारण केले. त्यातच रागाच्या भरात आरोपी विवेक मृत महिलेच्या घरात घुसला. हुज्जत घालत आरोपीने महिलेवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यातच महिलेचा मृत्यू झाला.

हत्या करुन आरोपी पोलीस ठाण्यात हजर

या घटनेनंतर नागभीड शहर तसेच चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. महिलेची हत्या करुन आरोपी खुद्द पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याने हत्या केल्याची कबुली दिली असून आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केलाय. या धक्कादायक घटनेमुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुण्यात एकाची हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 34 वर्ष कामगाराचा डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आल्याची धक्कादयक घटना पुण्यात घडली. ही घटना 10 ऑगस्टला सायंकाळी चार ते पाच दरम्यान नाणेकर वाडी येथील भवानी कंपनीच्या आवारात घडली होती. भवानी कंपनीत कामाला असणाऱ्या एका कामगाराला सहकारी कामगाराचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला आणि त्याने ही हत्या केली होती. अमोल गजानन मारणे या 38 वर्षीय कामगाराची रामेश्वर वामन पवार याने हत्या केली होती.

इतर बातम्या :

जीवे मारण्याची धमकी, जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक

VIDEO | क्षुल्लक कारणावरुन शेजाऱ्याची दाम्पत्याला बेदम मारहाण, व्हायरल व्हिडीओवरुन संताप

VIDEO: पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्येचा थरार सीसीटीव्ही कैद

(man killed married woman due to clash in Nagbhid city of Chandrapur district)

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.