Nashik Crime : मुलगा साखरझोपेत होता, सकाळी उठून ‘ते’ दृश्य पाहिल्यावर फोडला हंबरडा ! त्या घरात नेमकं काय झालं ?

पती-पत्नीच्या वादामुळे सोन्यासारखा संसार मोडला आणि हसतं-खेळतं घर क्षणात उद्ध्वस्त झालं. मुलगा रात्री झोपल्यानंतर आई-वडिलांच्या वादाने पेट घेतला आणि त्याचा शेवट अतिश दु:खद झाला. त्या घरात नेमकं काय झालं ?

Nashik Crime : मुलगा साखरझोपेत होता, सकाळी उठून 'ते' दृश्य पाहिल्यावर फोडला हंबरडा ! त्या घरात नेमकं काय झालं ?
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 11:50 AM

नाशिक | 14 सप्टेंबर 2023 : नवरा-बायकोचं नातं हे लोणच्यासारखं असतं. लोणचं थोडं आंबट-तिखट असतं, मुरत गेल्यावर त्याची चव आणखी वाढते. तसंच लग्नाचंही असतं. थोडे रुसवे फुगवे , भांडणं हे सर्वत्र असतं. पण काही ठिकाणी हे भांडण इतक वाढतं, ज्यामुळे मनभेद होतो आणि कधी-कधी त्या भांडणांचा शेवट अतिशय दु:खद होऊ शकतो. अशीच एक दु:खद आणि तितकीच घटना नाशिकमध्ये घडली असून नवऱ्याच्या एका टोकाच्या निर्णयामुळे, त्याने एक चुकीचं पाऊल उचलल्यामुळे सोन्यासारखा संसार मोडला. हसतं-खेळतं घर क्षणात (crime news) उद्ध्वस्त झालं.

नाशिक जवळ एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तेथे एक मुलगा रात्री आई-वडिलांसोबत जेवल्यानंतर झोपायला गेला. पण सकाळी उठून तो बाहेर आल्यावर त्याने जे दृश्य पाहिल्यावर त्याने हंबरडाच फोडला. त्याची आई जमिनीवर मृतावस्थेत आढळली तर वडिलांनी गळफास घेत त्यांचं आयुष्य संपवल.

नाशिकच्या आडगाव शिवारातील तुळजाभवानी रोहाऊस येथे हा दुर्दैवी घटना घडली असून एकच खळबळ माजली. विशाल घोरपडे आणि धनश्री घोरपडे अशी मृतांची नावे आहेत. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. हा खून दुसरा-तिसरा कोणी नाही तर पती विशाल यानेच केल्याचे समजते.

का उचललं टोकाचं पाऊल ?

लग्न झाल्यापासून विशाल हा धनश्री हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात अनेक वेळा वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी देखील त्या दोघांमध्ये वाद झाला. अखेर विशाल हा प्रचंड संताापला. त्यांचा मुलगा झोपेत असतानाच, विशालने रागाच्या भरात पत्नीची धनश्रीच्या डोक्यात वरवंटा घालून तिची हत्या केली. मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानंतर त्याने स्वत:च आयुष्य संपवण्याचाही निर्णय घेतला. आतल्या खोलीत जाऊन त्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. पहाटेच्या सुमारास ही घटना लक्षात येताच, एकच खळबळ माजली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.