तरुणीचे अश्लील व्हिडीओ असलेलं मेमरीकार्ड प्रत्येक घरासमोर ठेवलं; माथेफिरू तरुणाच्या कृत्याने संपूर्ण सोसायटी हादरली

एका 22 वर्षीय तरूणीचे आक्षेपार्ह अवस्थेत शूटिंग करून नंतर तोच व्हिडीओ दाखवत ब्लॅकमेल करून त्या तरूणीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित तरूणीने आरोपीच्या मागणीला नकार दिल्यानंतर त्याने ते अश्लील चित्रीकरण असलेले मेमरीकार्ड आणि व्हॉट्सॲप संभाषणाचे प्रिंटआऊट काढून, ती तरूणी रहात असलेल्या सोसायटीमधील प्रत्येक घरासमोर ठेवले.

तरुणीचे अश्लील व्हिडीओ असलेलं मेमरीकार्ड प्रत्येक घरासमोर ठेवलं; माथेफिरू तरुणाच्या कृत्याने संपूर्ण सोसायटी हादरली
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 11:44 AM

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : एका 22 वर्षीय तरूणीचे आक्षेपार्ह अवस्थेत शूटिंग करून नंतर तोच व्हिडीओ दाखवत ब्लॅकमेल करून त्या तरूणीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित तरूणीने आरोपीच्या मागणीला नकार दिल्यानंतर त्याने ते अश्लील चित्रीकरण असलेले मेमरीकार्ड आणि व्हॉट्सॲप संभाषणाचे प्रिंटआऊट काढून, ती तरूणी रहात असलेल्या सोसायटीमधील प्रत्येक घरासमोर ठेवले होते. गुरवैया बुसिरासी (४१) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित वर्षीय तरूणी नवी मुंबईतील रहिवासी आहे. ती आरोपीला पूर्वीपासूनच ओळखत असून दोघांमध्ये 2019 साली प्रेमसंबंध होते. फेब्रुवारी 2019 मध्ये आरोपीने पीडित तरूणीला एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली व त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर तेच शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने अनेकवेळा तिच्यावर अत्याचार केला. तसेच तो अनेकवेळा पीडित तरूणीला धमकावत होता. मात्र पीडित तरूणीने त्याला त्याला नकार दिला असता आरोपीने तिच्या सोसायटीमधील सर्व घरांच्या दरवाज्यांसमोर लिफाफे ठेवले. त्यात तरूणीचे खासगी चित्रीकरण असलेले मेमरी कार्ड व व्हॉट्सॲप चॅटचे प्रिंटआऊट होते. एवढंच नव्हे तर त्या लिफाफ्यामध्ये तरूणीबद्दल अश्लील गोष्टी लिहून तिची बदनामी करण्यात आली.

यामुळे पीडित तरूणी दडपणाखाली होती, झालेल्या बदनामीमिळे ती भेदरली. म्हणून तिने लगेच पोलिसांकडे धाव घेतली नाही. पण त्यानंतरही आरोपी तिला त्रास देतच होता, तिचा छळ कायम होता. अखेर या छळाला कंटाळून तिने रविवारी साकीनाका पोलिस स्टेसन येथे जाऊन सगळा प्रकार सांगत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.