Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरापूर्वी पतीचं निधन, आता दिराने वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन संपवलं!

10 महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे अपघाती निधन झाले होते. | Murder in Jalgaon

वर्षभरापूर्वी पतीचं निधन, आता दिराने वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन संपवलं!
औरंगाबादमध्ये हत्येचं सत्र सुरुच
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 1:03 PM

जळगाव: कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करत तिची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याचा प्रकार जळगावात घडला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री शहरातील पिंप्राळा उपनगर परिसरातील मयूर कॉलनीत घडली. योगिता मुकेश सोनार (वय 39, रा. मयूर कॉलनी, जळगाव) असे हत्या झालेल्या महिलेचे तर दीपक लोटन सोनार (वय 38, रा. मयूर कॉलनी, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. (Man murder his brother’s wife in Jalgaon Maharashtra)

मयत योगिता सोनार या शहरातील मयूर कॉलनीत त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. 10 महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे अपघाती निधन झाले होते. मुकेश यांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही निधन झाले होते. दरम्यान, त्यांच्यात कौटुंबीक कारणावरून सातत्याने वाद होत होते.

कालही योगिता आणि त्यांचा दीर दीपक सोनार यांच्यात अशाच प्रकारचा वाद झाला. तेव्हा संतापलेल्या दीपकने रागाच्या भरात वहिनी योगिता यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. योगिता यांना आठ वर्षांचा मुलगा आहे.

15 दिवसांपूर्वी जामिनावर सुटका, सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

औरंगाबादमध्ये एका सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. विशाल फाटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबादच्या बजाजनगर परिसरात अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पूर्व वैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत. तसेच गेल्यावर्षी वडगावात योगेश प्रधान या तरुणाच्या खून प्रकरणात तो आरोपी आहे. या प्रकरणी विशाल हा वर्षभर हर्सूल कारागृहात होता. पंधरा दिवसांपूर्वीच विशालची जामिनावर सुटका झाली होती.

बजाज नगर या भागात काल (21 मे) एका तरुणास दोन अनोळखी व्यक्ती मारहाण करत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. तसेच त्याचा चेहरा दगडाने ठेचलेला असल्याचेही पोलिसांना दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले.

संबंधित बातम्या : 

कोव्हिड रुग्णालयातून डिस्चार्जची तयारी, मात्र कोरोना रुग्णाचा रुग्णालयातच गळफास

सॉरी बाबा, सासरी येऊन चुकले, रडत-रडत व्हिडीओ रेकॉर्ड, विवाहितेची आत्महत्या

माजी पोलीस अधिकाऱ्याकडून लैंगिक शोषण, दोन महिलांची हत्या, घरात 14 मृतदेहांचा खच, हत्येचं गूढ कसं उलगडणार?

(Man murder his brother’s wife in Jalgaon Maharashtra)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.