प्रेयसीच्या हत्येप्रकरणी पकडलं, आरोपी म्हणाला, बायकोलाही 2 वर्षापूर्वी पुरलंय!

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात डॉक्टर संतोष पोळ हत्याकांडानंतर अजून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. या आगळ्यावेगळ्या हत्याकांडामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी पकडलं, आरोपी म्हणाला, बायकोलाही 2 वर्षापूर्वी पुरलंय!
आरोपीने आपली पत्नी आणि प्रेयसीचा खून केला.
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 5:42 PM

सातारा : जिल्ह्यातील वाई तालुक्यात दुहेरी खुनाची थरारक घटना उघडकीस आली आहे. वाई तालुक्यातील व्याजवाडी परिसरात नितीन गोळे या आरोपीने आपली पत्नी आणि प्रेयसी अशा दोघींचाही खून केला आहे. 3 ऑगस्ट रोजी प्रेयसीचा खून केल्यानंतर नितीन गोळेने 2019 मध्ये आपल्या पत्नीचाही खून करुन तिला ओढ्यात पुरल्याचं समोर आलं आहे. हे दोन्ही गुन्हे आरोपीने कबूल केले आहेत. या आगळ्यावेगळ्या हत्याकांडामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. (man murdered his Wife Girlfriend buried them in farm and rivulet satara mysterious double murder mystery revealed)

नितीनने प्रेयसी आणि पत्नी दोघींनाही संपवलं

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात डॉक्टर संतोष पोळ हत्याकांडानंतर अजून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर पोळने अनेक खून केले होते, अगदी तशाच पद्धतीने नितीन गोळे या आरोपीने अतिशय निर्घृण पद्धतीने दोन खून केले आहेत. त्याने आपली प्रेयसी आणि पत्नी अशा दोघींनाही संपवलं आहे. आरोपीने 2019 मध्ये एक आणि आता 3 ऑगस्ट रोजी एक असे एकूण दोन खून केल्याचे समोर आले आहे.

प्रेयसीचा मृतदेह शेतात आणि पत्नीचा मृतदेह ओढ्यात पुरला

आरोपी नितीन गोळेने 3 ऑगस्टला प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करून तिचा मृतदेह शेतात लपावला होता. या प्रकारणाचा भुईंज पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व प्रकरण उजेडात आले. भुईंज पोलिसांनी आरोपी नितीनला कर्नाटकमधून ताब्यात घेतले. तसेच त्याची सखोल चौकशी केली. त्यानंतर पोलीस तपासात 2019 मध्ये नितीन गोळेने पत्नी मनीषा गोळे हीचादेखील खून केल्याचे समोर आले. आरोपी नितीनने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला होता.

पोलिसांनी पत्नीचा सांगाडा बाहेर काढला

ही घटना समजताच पोलिसांनी तपासकार्याला वेग दिला. पोलिसांनी नितीन गोळेची पत्नी मनीषा गोळे यांचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता, त्या ठिकाणी जाऊन खोदकाम सुरु केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी तसेच पोलिसांचे पथक उपस्थित होते. पोलिसांनी पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढलाय.

साताऱ्या एकच खळबळ

दरम्यान, या प्रकारामुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासकार्याचे नागरिक स्वागत करत आहेत. तसेच या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला कठोर शिक्षा केली जावी अशी मागणीदेखील नागरिक करत आहेत. भुईंज आणि वाई पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

इतर बातम्या :

VIDEO : नांदेडच्या मुख्य वस्तीत बंदुकीचा धाक दाखवून लुटमार, घटना सीसीटीव्हीत कैद

VIDEO: पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्येचा थरार सीसीटीव्ही कैद

तो रोज स्मशानात जायचा, जीवाच्या आकांताने रडायचा, अखेर त्यानेही विपरीत केलं, मन विषण्ण करणारी घटना

(man murdered his Wife Girlfriend buried them in farm and rivulet satara mysterious double murder mystery revealed)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.