Wardha Murder | अंगावर गाडी घातली, फरफटत नेलं, 2 हजारांसाठी वर्धा जिल्ह्यात हत्या

वर्ध्यातील नागसेन नगर परिसरात गुरुवारी रात्रीच्या ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. मृताचे नाव शंभू सोनगडे असे आहे.

Wardha Murder | अंगावर गाडी घातली, फरफटत नेलं, 2 हजारांसाठी वर्धा जिल्ह्यात हत्या
WARDHA MURDER
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 8:15 PM

वर्धा : व्याजाने घेतलेले दोन हजार रुपये परत केले नसल्याचा राग धरत अंगावर गाडी घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपीने रागाच्या भरता शिवीगाळ करत हा प्रकार केलाय. वर्ध्यातील नागसेन नगर परिसरात गुरुवारी रात्रीच्या ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. मृताचे नाव शंभू सोनगडे असे आहे.

दोन हजार रुपये न दिल्यामुळे वाद 

मिळालेल्या माहितीनुसार नागसेननगर येथील जयमाला शंभू सोनगडे यांनी एका महिलेच्या मध्यस्थीने पाच हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील तीन हजार रुपयांचा परतावादेखील केला होता. या रकमेतील दोन हजार रुपये परत द्यायचे होते. त्याकरीता 2 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शैलेश येळणे रा. पंजाब कॉलनी गजानननगर हा सोनगडे यांच्या घरी गेला. त्यावेळी शैलेश येळणे याने उर्वरित रकमेची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने दोन तीन दिवसांत परतावा करेल, असे सांगितले. त्यावरून येळणे याचा सोनगडे यांच्याशी वाद झाला.

अंगावर गाडी घातली, फरफटत नेले 

हा वाद वाढत असल्यामुळे उपस्थितांनी येळणे याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वादानंतर शैलेश येळणे घराबाहेर आला आणि गाडीत बसला. दरम्यान, बाहेर गेल्यानंतर शैलेश येळणेने कार सुरू करत बाहेर आलेल्या शंभू सोनगडे यांच्या अंगावर नेली. त्यात गाडीने शंभू सोनगडे यांना फरफटत नेले. हा प्रकार समोरच घडत असल्यामुले लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत शंभू सोनगडे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी पंचनामा केला, तपास सुरु 

दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी भेट देत पाहणी केली. येथे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरू केला.

इतर बातम्या :

लग्न समारंभातून चिमुकलीला पळवलं, बलात्कार करुन हत्या, मृतदेह शेतात सापडला

Nagpur shocking खऱ्या समजून दिल्या खेळण्यातल्या नोटा, मित्रानेच का दिला साडेचार लाखांचा दगा?

Dombivli Gang Rape | डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरण, 33 जणांविरुद्ध 885 पानी आरोपपत्र

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.