ऑनलाइन चिकन बिर्याणी मागवणं महागात पडलं, पॅकेट उघडल्यावर आतमध्ये….
नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमधून एका हैराण करणारी बातमी समोर आली आहे. तेथील चिकन बिर्याणी खूप फेमस आहे. पण तीच बिर्याणी मागवणं एका इसमाला खूप महागात पडलं
हैदराबाद | 5 डिसेंबर 2023 : नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमधून एका हैराण करणारी बातमी समोर आली आहे. तेथील चिकन बिर्याणी खूप फेमस आहे. पण तीच बिर्याणी मागवणं एका इसमाला खूप महागात पडलं. भूक लागली म्हणून एका इसमाने झोमॅटोवरून चिकन बिर्याणी मागवली, थोड्याच वेळात ती घरी डिलीव्हरही झाली. पण जेव्हा त्या व्यक्तीने पॅकेट उघडलं, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तो बिथरलाच. कारण पॅकेटधील बिर्याणीत त्याला चक्क मेलेली पाल सापडली.
ई….. वाचूनच कसंतरी झालं ना, पण हे खरं आहे. बिर्याणीमध्ये मेलेली पाल सापडल्यानंतर त्या माणसाने X (पूर्वीचं ट्विटर) या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर एक पोस्टही केली. झोमॅटो डिलीव्हरी बॉय चिकन बिर्याणीसोबत मेलेली पालही घेऊन आला, असं त्याने लिहीलं होतं.
बिर्याणीत पाल सापडल्याने माजला गदारोळ
हैदराबादमधील डीडी कॉलनी येथे राहणाऱ्या इसमाने बावर्ची हॉटेलमधून ऑनलाइन चिकन बिर्याणी मागवली होती. पण पार्सल उघडल्यानंतर त्या बिर्याणीमध्ये मेलेली पाल सापडल्याने घरातील सगळेच हैराण झाले. हॉटेलच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केली. असा अनुभव आल्यानंतर पुढल्या वेळेस ऑनलाइन जेवण मागवण्याआधी ते किमान १० वेळा तरी विचार करतील.
హైదరాబాద్ ఆర్టీసీ క్రాస్ రోడ్ లోనీ బావర్చి హోటల్లో చికెన్ బిర్యానిలో ప్రత్యక్షమైన బల్లి
అంబర్పేట డిడి కాలనీ కి చెందిన విశ్వ ఆదిత్య ఆన్లైన్లో జొమాటోలో చికెన్ బిర్యానికి ఆర్డర్
జొమోటో బాయ్ తీసుకువచ్చిన చికెన్ బిర్యానిలో బల్లి వచ్చిందని కుటుంబ సభ్యుల ఆరోపణ
బావర్చి యాజమాన్యం… pic.twitter.com/5h0x1fltiQ
— Telugu Scribe (@TeluguScribe) December 2, 2023
झोमॅटोने दिला रिस्पॉन्स
यासंदर्भातील पोस्ट ऑनलाइन शेअर केल्यानंतर झोमॅटोतर्फे त्यावर उत्तरही देण्यात आलं. ‘ ही अतिशय गंभीर बाब असून आम्ही त्याची दखल घेतली आहे. संबंधित कस्टमरशी आमचं बोलणं झालं आहे. यापुढे असा प्रकार अथवा अशी चूक घडू नये यासाठी आम्ही काळजीपूर्वक पावले उचलू ‘ असे स्पष्टीकरण झोमॅटोतर्फे देण्यात आले. सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली असून नेटीझन्स त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
We have identified the issue and spoken to the customer. We take this very seriously and are working on appropriate next steps.
— zomato care (@zomatocare) December 3, 2023
झुरळामुळे ‘बडेमिया’च्या कोट्यवधींच्या व्यवसायाला ब्रेक
मुंबईमधील नामांकित हॉटेलांपैकी एक असेलल्या बडे मिया हॉटेलला टाळा लागलं. 1946 साली अवघ्या 20 रूपयांमध्ये सुरु झालेलं हॉटेल आज कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. मात्र एका झुरळाने व्यवसायासाला ब्रेक लागला.
‘बडे मिया’ हॉटेलला सील करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांनाच नाहीतर सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला. कारण हॉटेलच्या किचनमध्ये उंदीर आणि झुरळांचा वावर निदर्शनास आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून छापेमारी करण्यात आली. त्यामुळे गेल्या पिढ्यानपिढ्या सुरू असलेलं बडे मिया हॉटेलला आता कुलूप लागलं.