आधी 70 हजार रुपयांत विकत घेतलं, नंतर मित्रांसोबत मिळून केली पत्नीची हत्या, या सवयीमुळे पती होता नाराज..
पतीने इतर मित्रांसोबत मिळून पत्नीची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह सरळ जंगलात फेकून दिला.
नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : राजधानीतील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतानाच (crime news) दिसत आहे. आता पुन्हा एका दुर्दैवी घटना समोर आली आहे. इथे एका इसमाने प्रथम 70 हजार महिलेला खरेदी केलं, तिच्याशी लग्नही केलं. पण नंतर तिची एक सवय न आवडल्याने तिची थेट हत्या (murder) करून मृतदेह जंगलातच फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली (man killed wife) असून त्यांनी गुन्हा कबूलही केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील फतेहपुरी बेरी भागातील एका जंगलात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना फोनवरून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. शनिवारी रात्री त्या भागात एक रिक्षा आली होती, असे तपासात समोर आले. पोलिसंनी त्या रिक्षाचा रजिस्ट्रेशन नंबर शोधत त्याच्या ड्रायव्हरचा माग काढला.
ऑटो ड्रायव्हर अरूण हा दिल्लीतील छत्तरपूरच्या गदईपूर बांध रोड भाग राहतो. त्याची चौकशी केली असता मृत महिलेचे नाव स्वीटी असून धर्मवीर असे तिच्या पतीचे नाव असल्याचे समजले.
तिघांनी दाबला गळा
अरूणने हेही सांगितले त्याने धर्मवीर आणि सत्यवान याच्यासोबत मिळून स्वीटीची हत्या केली. दिल्ली-हरियाण बॉर्डरडवळ त्यांनी स्वीटीचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला.
अरूणने दिलेल्या माहितीनुसार, धर्मवीर हा त्याच्या पत्नीसोबत खुश नव्हता, कारण ती वारंवार न सांगताच माहेरी जात असे. रिपोर्ट्सनुसार, धर्मवीर याने 70 हजार रुपये देऊन स्वीटीला विकत घेतले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांबद्दल जास्त माहिती नव्हती. मात्र ती वारंवार न सांगता निघून जायची, यामुळे धर्मवीर संतापला होता आणि त्याच रागात त्याने तिची हत्या केली.