शेजाऱ्यानेच केला 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाच्या कृत्यामुळे अहमदनगरमध्ये खळबळ

संगमनेरमध्ये एका चार वर्षाच्या चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. रोशन ददेल असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शेजाऱ्यानेच केला 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाच्या कृत्यामुळे अहमदनगरमध्ये खळबळ
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 10:43 PM

अहमदनगर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. संगमनेरमध्ये एका चार वर्षाच्या (minor girl) चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. रोशन ददेल असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संगमनेर शहरात एकच खळबळ उडालीय. (man raped Four year old minor girl is been arrested by Sangamner Ahmednagar police)

घराशेजारीच राहणाऱ्या रोशन ददेलने केला अत्याचार 

मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी संगमनेर शहरात एका चार वर्षीय चिमूरडीवर अत्याचार करण्यात आला. चिमूरडीच्या घराशेजारीच राहणाऱ्या रोशन ददेल या नराधमाने हे कृत्य केले. या गंभीर  प्रकाराची दखल घेत पोलिसांनी आरोपी ददेल याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आरोपीला कडक शिक्षा केली जावी

या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर पोलीस करत आहेत. मात्र, फक्त चार वर्षांच्या चिमुरडीवर अशा प्रकारे गैरकृत्य केल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपीला कडक शिक्षा केली जावी अशी मागणी केली जातेय.

परभणीत पित्यानेच केला मुलीवर अत्याचार 

असाच एक धक्कादायक प्रकार 13 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातील पाथर तालुक्यात घडला. येथे एका जन्मदात्या पित्याने आपल्या 14 वर्षीय अल्पवीयन मुलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी पित्याविरोधात पाथरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पित्याने आपल्याच 14 वर्षीय मुलीवर अश्लिल चित्रफित दाखवत हा अत्याचार केला होता. अत्याचार केल्यानंतर हा प्रकार आईला सांगितला तर फिनाईल पाजून जीवे मारेन अशी धमकीसुद्धा दिली होती.

इतर बातम्या :

दोन दिवसांपासून प्रेयसीशी वाद, शेवटी घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या, चंद्रपूर हादरलं

नाशिक शिक्षणाधिकारी लाच प्रकरण, वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला, आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; तर बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

(man raped Four year old minor girl is been arrested by Sangamner Ahmednagar police)

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.