धावत्या रिक्षेतील थरार, दोघांचे भांडण झाले अन् संतापलेल्या त्याने चाकू काढून तिच्यावर…

आरोपी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रिक्षातून प्रवास करत असताना, त्यांच्यात वाद सुरू झाला. संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे समजते.

धावत्या रिक्षेतील थरार, दोघांचे भांडण झाले अन् संतापलेल्या त्याने चाकू काढून तिच्यावर...
जुन्या वादातून व्यक्तीला संपवले
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 10:44 AM

मुंबई : शहरातील गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून साकीनाका येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील (Mumbai) साकीनाका (Saki Naka) परिसरातील खैरानी रोड येथे एका महिलेचा चालत्या रिक्षात खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका तरूण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रिक्षातून प्रवास करत असताना त्यांचा वाद झाला. संतापलेल्या तरूणाने महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली. ही घटना सोमवारी (19 जून) घडली असून पंचशीला अशोक जामदार (३०) असे मृत महिलेचे नाव आहे.

एवढेच नव्हे तर स्वत: त्या महिलेवर वार केल्यानंतर त्या आरोपीने धारदार चाकूने स्वत:वरही वार करत आत्महत्येचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. पंचशीला हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपक बोरसे याला अटक केली आहे. दोघेही ऑटोरिक्षाने कुठेतरी जात असताना ही घटना घडली आणि प्रवासादरम्यान त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला पंचशीला अशोक जमादार या संघर्ष नगर चांदिवली, मुंबई येथील रहिवासी होत्या. ऑटो प्रवासादरम्यान दीपक व पंचशीला यांच्यादरम्यान भांडण झाले असता त्याने त्याच्यावर अमानुष हल्ला केला. त्यानंतर दीपकने स्वत:वरही चाकूने वार केले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने रिक्षात धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जखमी महिलेची प्रकृती झपाट्याने खालावली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. आत्महत्येच्या अयशस्वी प्रयत्नात आरोपीलाही किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी दीपक हा व पंचशीला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.