घरावर मोठा डल्ला मारला, चोरीनंतर एकटाच फिरत राहिला, पण ‘इन्स्टाग्राम’मुळे पकडला गेला अतिशहाणा चोर !

ज्या घरात अनेक वर्ष काम केलं तिथेच चोरी करत मोठा डल्ला मारला आणि आरोपी बाहेर फिरायलाही गेला. मात्र त्याच्या इन्स्ट्गारम अकाऊंटमुळे तो पकडला गेला आणि पोलिसांनी त्याची रवानगी तुरूंगात केली.

घरावर मोठा डल्ला मारला, चोरीनंतर एकटाच फिरत राहिला, पण 'इन्स्टाग्राम'मुळे पकडला गेला अतिशहाणा चोर !
कर्ज फेडण्यासाठी बाईक चोरी करणारा चोरटा अटक
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 10:19 AM

नवी दिल्ली | 18ऑगस्ट 2023 : गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी अतिआत्मविश्वासाच्या भरात तो अशी एखादी चूक करतोच ज्यामुळे त्याचा गुन्हा उघड होतोच. असं काहीसं प्रकरण समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी पंजाबच्या लुधियाना मध्ये कोट्यावधींची रोकड चोरणारी मुख्य आरोपी अवघ्या 10 रुपयांच्या फ्रुटीच्या नादात पकडली गेली होतं.

तशीच एक केस समोर आली आहे, जिथे चोर (thief) त्याच्याच अतिशहाणपणामुळे पकडला गेला होता. आरोपी इसम एका महिलेच्या घरी काम करत होता, त्याने तिच्याकडेच चोरी केली आणि फिरायला गेला. पण इन्स्टाग्राममुळे (Instagram) त्याची चोरी पकडली गेली व पोलिसांनी त्याला अटक केली.

60 वर्षीय महिलेकडे काम करणाऱ्या 29 वर्षीय संजीवने लाखो रुपयांचे दागिने चोरून एकट्याने देशातील हिल स्टेशनवर जाण्याची योजना आखली होती. अवघ्या आठवड्याभरात आरोपीने जवळपास अर्धा डझन ठिकाणी जाऊन तेथील व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोडही केली. मात्र, दिल्ली पोलिसही आपल्या अकाऊंटवर नजर ठेवून आहेत, याचा त्याला सुगावाही लागला नाही. फॉलोअर्सना आपली माहिती देणेच त्याला महागात पडले आणि त्याच्या अटकेसाठी कारणीभूतही ठरले.

11 जुलै रोजी उत्तम नगर भागातील दाल मिल रोडवर चोरीची घटना घडली. आपल्या घरातून किमान 12 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार एका वृद्ध महिलेने नोंदवली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी पथकही तयार करण्यात आले.

पोलिसांची आरोपीवर सतत होती नजर

“पोलिसांच्या पथकाने याप्रकरणाचा तपास सुरू करत चोरी झालेल्या ठिकाणाचे तसेच आसपासच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यादरम्यान एका फुटेजमध्ये संशयित संजीव हा पीडितेच्या घरातून घाईघाईने जाताना दिसला. त्यानंतप पोलिसांनी संजयच्या फोनवर पाळत ठेवली. आरोपी हा गेल्या तीन वर्षांपासून पीडित महिलेच्या आईच्या घरी काम करत होता. तसेच त्यांची छोटी-मोठी कामेही करायचा.

वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी चोरी केल्यानंतर आरोपी गोल्ड लोनच्या एका दुकानात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर समजले. त्याने तेथे सुरक्षेच्या कारणास्तव सोन्याच्या दोन अंगठ्या आणि 20 हजार रुपये ठेवले होते. त्यानंतर आरोपी सतत त्याच्या जागा बदलत एकटाच फिरत होता. प्रथम तो हरिद्वारला जाऊन एक दिवस राहिला, नंतर हृषीकेशमध्येही एक दिवसासाठी मुक्काम केला. नंतर तो बद्रीनाथला रवाना झाला आणि तिथे तीन-चार दिवस राहिला. नंतर बसने तो उत्तराखंडमधील चमोवी येथे पोहोचला. तेथून विमानाने त्याने थेट केरळ गाठलं. मात्र या सर्व जागांबद्दल तो इन्स्टाग्राम वरील स्टोरीजमध्ये माहिती देत होता.

इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे जवळपास 100 फॉलोअर्स आहेत. त्याच्या पोस्ट्सवर पोलिस सतत लक्ष ठेवून होते. हा आरोप फरार आहे आणि तो तिथे त्यांच्या हॉटेलमध्ये राहू शकतो, याची कल्पना पोलिसांनी आधीच उत्तराखंडच्या हॉटेल असोसिएशनला दिली होती. चोरीच्या घटनेनंतर तो एकटाच बाहेर फिरायला गेला आणि इन्स्ट्ग्राम स्टोरीमुळे पकडला गेला, असे पोलिसांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.