Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्याकडे जायची, प्रकरण उघड होताच सर्वांना धक्का, काय होतं कारण ?

नात्यांना लाजवेल असं एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. तेथे एक महिला तिच्या नवऱ्याला झोपेची गोळी देऊन त्यानंतर तिच्या सासऱ्यांच्या खोलीत निघून जायची. त्या दोघांमध्येही अनैतिक संबंध होते.

नवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्याकडे जायची, प्रकरण उघड होताच सर्वांना धक्का, काय होतं कारण ?
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 3:01 PM

झाशी | 21 नोव्हेंबर 2023 : झाशी येथून नात्यांना लाजवेल असं एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. तेथे एक महिला तिच्या नवऱ्याला झोपेची गोळी देऊन त्यानंतर तिच्या सासऱ्यांच्या खोलीत निघून जायची. त्या दोघांमध्येही अनैतिक संबंध होते. सासऱ्यासोबत राहण्यासाठी त्याची सून रोज रात्री तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या द्यायची. एवढेच नव्हे तर ते दोघे बसून दारूही प्यायचे. मात्र एक दिवस त्यांच्या कुटुंबियांसमोर है अनैतिक नातं उघडकीस आलं आणि एकच गदारोळ माजला. मात्र त्यानंतर सासऱ्याने विष पिऊन थेट त्याच आयुष्यचं संपवलं. पण त्यापूर्वी त्याने फोन करून त्याच्या पत्नीची माफी मागितली.

तोडीफतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या 48 वर्षीय रवी (काल्पनिक नाव) याने विष प्राशन करून आत्महत्या केली. रवीच्या पहिल्या पत्नीचे सुमारे 20 वर्षांपूर्वी निधन झाले. त्याला मूलबाळ नव्हते. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर रवीच्या कुटुंबीयांनी शांतीदेवी (काल्पनिक नाव) या महिलेशी त्याचे दुसरे लग्न लावून दिले. तिच्याही पहिल्या पतीचे निधन झाले होते आणि तिला एक चर वर्षांचा मुलगा होता. लग्नानंतर शांतीदेवी आणि तिचा नुलगा रवी यांच्यासोबत राहू लागले. सगळं काही आलबेल होतं. मुलगा मोठा झाल्यावर पाच वर्षांपूर्वी त्याचंही लग्न लावून देण्यात आलं.

सासरा आणि सुनेते होते अवैध संबंध

मात्र मुलाच्या लग्नानंतर घरात आलेली सून त्यांना त्रास देऊ लागल्याचे शांतीदेवी यांनी सांगितलं. त्यांना सगळ्यात मोठा धक्का तर तेव्हा बसला, जेव्हा त्यांनी त्यांचा पती रवी आणि तिची सून या दोघांना एकमेकांसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. ते पाहून तर शांतीदेवी कोसळल्याच. पण रवी आणि सुनेने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने, त्या गप्प बसला.

असा झाला उलगडा

शांती देवी यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो आणि तिथेच मजुरीचे काम करतो. सुनेच्या आग्रहामुळे तो पाच महिने घरीही आला नव्हता. ती त्याला धमकावायची, आणि दाबून ठेवायची. भाऊबीजेच्या दिवशी ते दोघंही ( पती रवी आणि सून) त्याला ( मुलाला) मारायचा प्लान करत होते, हे शांती देवीने ऐकलं. त्या दोघांनी कुऱ्हाडही तयार करून ठेवली होती. मात्र हे पाहून शांतीदेवी घाबरल. आपल्या मुलाचा जीव धोक्यात आहे, हे लक्षात आल्यावर काहीही करून त्याला वाचवायचंच, असं तिने ठरवलं. काहीतरी कारण काढून ती तिच्या भावांच्या घरी गेली आणि सगळ्यांना खरा प्रकार सांगितला.

विषप्राशन करून सासऱ्याने संपवलं आयुष्य

शांतीदेवी माहेरी असतानाच तिला तिच्या पतीचा फोन आला. मी खूप चुकीचा वाकलो, मी आता विषप्राशन करतोय, असे त्याने तिला सांगितलं. त्याने खरंच जीव देण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. जे झालं तरे झालं पण आता माझ्या सुनेने मुलासोबत राहून घरं नीट सांभाळावं, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.