गुरे घेऊन जाणे जीवावर बेतले, मारहाणीनंतर इसमाचा मृत्यू

गुरे नेणाऱ्या इसमाचा मृतदेह इगतपुरी भागातील घाटनदेवी येथील घाटातून सापडल्यानंतर हा कथित गुन्हा उघडकीस आला.

गुरे घेऊन जाणे जीवावर बेतले, मारहाणीनंतर इसमाचा मृत्यू
अनैतिक संबंधातून पतीची हत्या
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 6:07 PM

नाशिक : गुरांची वाहतूक (cattle) करणाऱ्या एका इसमाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समजते. एका गटाने गुरांची वाहतूक करणाऱ्या 23 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याचे समोर आले असून त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

10 जून रोजी अन्सारी यांचा मृतदेह इगतपुरी भागातील घाटनदेवी येथील घाटातून सापडल्यानंतर हा कथित गुन्हा उघडकीस आला, असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. ते बजरंग दलाशी संबंधित असल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गुरांची अवैधरित्या वाहतुक होत असल्याचे समोर आले आहे.

8 जून रोजी अन्सारी हा इसम त्यांच्या दोन साथीदारांसह टेम्पोमधून गुरांची वाहतूक करत होता. तेव्हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ सुमारे 10-15 कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर या गटाने टेम्पोचा ताबा घेतला आणि गाडी पुढे नेण्यापूर्वी चार गुरांची सुटका केली.

त्यानंतर त्यांनी एका निर्जन ठिकाणी टेम्पो थांबवून अन्सारी व त्याच्या दोन्ही साथीदारांना मारहाण केली. त्याचे इतर सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाले, पण अन्सारी हा इसम निसटू शकला नाही. मात्र अन्सारी हा दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा आरोपींनी केला आहे. मात्र पोलिसांना वेगळाच संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.