लग्नानंतरही ती सोडत नव्हती विवाहीत प्रियकराची पाठ, सुटका मिळवण्यासाठी त्याने उचललं भयानक पाऊल….
27 वर्षीय तरूणी आणि 33 वर्षीय इसमाचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्या इसमाच्या लग्नानंतर त्याच्या काकाने त्याला वॉर्निग दिली, तरीही तरूणीला त्याच्यासोबतच रहायचं होतं. तिच्यापासून सुटका करण्यासाठी प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर सरळ...
चेन्नई : प्रेयसीच्या तगाद्यापासून सुटका मिळवण्यासाठी विवाहीत प्रियकराने टोकाचे पाऊल उचलत तिलाच संपवण्याचा प्रयत्न केल्याची (man tried to kill lover) धक्कादायक घटना घडली आहे. 33 वर्षीय इसमाने तरूणीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळण्याचा (woman set on fire) प्रयत्न केला. या दुर्घटनेत गंभीररित्या होरपळलेल्या तरूणीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून ती अद्याप मृत्यूशी लढा देत आहे. तामिळनाडूतील चेंगलपट्टू येथे ही धक्कादायक घटना घडली असून पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , चेंगलपट्टू येथे राहणारी 27 वर्षीय प्रिया आणि 33 वर्षीय प्रताप या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. पोलिसांच्या सांगण्यानुसार, प्रताप हा चित्रकार असून तो विवाहीतही आहे. मात्र लग्नानंतरही प्रिया व प्रताप या दोघांचे संबंध कायम होते. पण प्रतापच्या काकाला ही गोष्ट समजली आणि त्याने प्रतापला कडक इशारा देत हे संबंध संपवण्यास सांगितले. त्यामुळे प्रतापने प्रियाशी असलेले संबंध तोडण्याच प्रयत्न केला. मात्र प्रिया या गोष्टीसाठी तयार नव्हती. त्याच मुद्यावरून शुक्रवारी त्यांच्यात वाद झाला आणि प्रियाने प्रतापशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
यामुळे संतापलेल्या प्रतापने अतिशय धोकादायक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी, शनिवारी तो प्रियाच्या घरी गेला आणि त्याने तिच्या अंगावर रॉकेल शिंपडून तिला पेटवून दिले अन् तो तेथून फरार झाला. या दुर्घटनेत प्रिया बरीच होरपळली असून तिला उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे ती अद्याप मृत्यूशी लढा देत आहे. पोलिस आरोपी प्रतापचा शोध घेत आहेत.
यापूर्वीही झाला होता असा खतरनाक प्रकार
याच वर्षी एप्रिलमध्ये चेन्नईच्या नांगनाल्लूरमध्ये अशीच एक भयानक घटना घडली होती. कोवलम बीचजवळ एका (माजी) प्रेयसीने तिच्या प्रियकराचे तुकडे करून ते समुद्रकिनाऱ्याजवळ फेकले होते.
तर फेब्रुवारीमध्ये, तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात एका २५ वर्षीय नर्सला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. रिपोर्टनुसार, महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केली व ती आत्महत्या असल्याचे भासवले होते.