जुन्या वादाचा राग मनात ठेऊन तरूणाची 9 जणांकडून हत्या, अवघ्या 48 तासांत छडा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र जीव मुठीत धरून जगत आहेत. चोरी, दरोडा, खून , हत्या या गुन्ह्यांनी राज्य हादरलं असून राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र जीव मुठीत धरून जगत आहेत. चोरी, दरोडा, खून , हत्या या गुन्ह्यांनी राज्य हादरलं असून राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खेड परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत तपास करून अवघ्या 48 तासांत या गुन्ह्यामागच्या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. घोटी पोलीस स्टेशन आणि नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या हत्येमागचं कारण ऐकून पोलीसही हादरलेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 ते 3 वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा राग या टोळक्याच्या मनात धुमसत होता. त्याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी हा गुन्हा केला. समाधान आगीवले असे मृत तरूणाचे नाव असून त्याच्या शरीरात चाकू भोसकूव त्याची हत्या करण्यात आली. समाधान आणि आरोपींचा दोन-तीन वर्षांपूर्वी शाळेवरून काही वाद झाला होता. त्यानंतर समाधान तो विसरून गेला. मात्र त्या टोळक्याने हा राग मनातच ठेवला आणि संधी मिळताच इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खेड परिसरात समाधानचा खून केला. 9 जणांना मिळून त्याच्यावर हल्ला करत त्याला संपवलं. यामुळे प्रचंड खळबळ माजली होती.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घोटी पोलीस स्टेशन आणि नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासलं तसेच खबऱ्यांकडून त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आता गुन्हेगारांचा शोध लावला. पोलिसांनी इगतपुरी तालुक्यातील विविध गावातून नऊ जणांना ताब्यात घेतल आहे. मात्र या प्रकरणामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिली