ATM Fraud : एटीएममध्ये मदत मागणे महागात पडले, पैसे टाकण्याच्या बहाण्याने तिघांकडून गंडा
कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये खेमराज नंदनवार हे पैसे डिपॉझिट करण्यासाठी गेले होते. मात्र पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात माहिती नसल्याने त्यांनी याचवेळी एटीएममध्ये आलेल्या एकाची मदत घेतली.
कल्याण : एटीएममध्ये पैसे डिपॉझिट करण्याच्या बहाण्याने एका इसमाला तीन जणांनी गंडा घातल्याची घटना कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात घडली आहे. हे तिन्ही भामटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत. खेमराज नंदनवार असे लुटण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. खेमराज यांचे पैसे लुटल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले.
पैसे डिपाझिट करण्यासाठी मदत मागितली
कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये खेमराज नंदनवार हे पैसे डिपॉझिट करण्यासाठी गेले होते. मात्र पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात माहिती नसल्याने त्यांनी याचवेळी एटीएममध्ये आलेल्या एकाची मदत घेतली.
पैसे डिपॉझिट करुन देण्याच्या बहाण्याने लुटले
मदत मागितलेल्या इसमासोबत एटीएममध्ये दोन साथीदार देखील आले. या तिघांनी पैसे डिपॉझिट करुन देतो सांगत लंपास केले. काही वेळाने रिसिट मिळाल्यावर खेमराज यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी खेमराज यांनी पोलीस स्थानकात धाव घेत तीन अज्ञात इसमांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला. पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.