पत्नी- मुलीसह मंदिरात पूजा केली, नंतर त्यांनाच पुलावरून नदीत ढकललं… त्याने असं का केलं ?

गुजरातच्या वलसाडमधून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एक इसमाने त्याची पत्नी आणि 11 वर्षांची लेक या दोघींनाही नदीत धक्का दिला. पाण्याच बुडून त्या दोघींचाही दुर्दैवाने मृत्यू झाला.

पत्नी- मुलीसह मंदिरात पूजा केली, नंतर त्यांनाच पुलावरून नदीत ढकललं... त्याने असं का केलं ?
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 3:23 PM

गांधीनगर | 23 डिसेंबर 2023 : गुजरातच्या वलसाडमधून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एक इसमाने त्याची पत्नी आणि 11 वर्षांची लेक या दोघींनाही नदीत धक्का दिला. पाण्याच बुडून त्या दोघींचाही दुर्दैवाने मृत्यू झाला. एवढंच नव्हे तर त्या दोघींना नदीत ढकलल्यावर त्या इसमान स्वत:देखील नदीत (जीव देण्यासाठी) उडी मारली. मात्र आजूबाजूच्या लोकांनी पटकन धाव घेऊन त्याला वाचवलं. रिपोर्ट्सनुसार, त्या इसमाची पत्नी आणि मुलगी या दोघांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरामुळे एकच खळबळ माजली आहे.

विजय पांडे ( वय 45) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय हाहमरान गावच्या वरोली नदीजवळ असलेल्या एका पुलावरील खांबाजवळ आढळला. इतर लोकांनी त्याचा जीव वाचवला. पोलिसांच्या सांगण्यानुसार, त्या इसमाच्या पच्नीला फिट्स येत होत्या आणि त्याची मुलगी मानसिक दृष्ट्या आजारी होती. त्याने त्या दोघीनांही नदीत धक्का दिल्याने, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

आधी मंदिरात जाऊन पूजा केली

विजय याची पत्नी गायत्रीदेवी (वय 40) आणि लेकीचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आला. आरोपी विजय याने दिलेल्या कबुलीनुसार, घटनेच्या दिवशी तो, पत्नी आणि मुलीसह एका शिव मंदिरात गेले आणि तेथे पूजा झाल्यावर ते पूल पाहण्यासाठी गेले. तेव्हाच मी त्या दोघींना नदीत धक्का दिला.

त्यानंतर विजय यानेही पाण्यात उडी मारून स्वत:चं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण घाबरल्यामुळे त्याने तेथे एक खांबाला पकडलं आणि त्याचा जीव वाचला. नंतर स्थानिकांनी त्याला पाण्याबाहेर काढलं. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी विजय याने हे कृत्य का केलं, हे अद्याप समजू शकलेलं नाही, पोलिस अधिक तपास करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.