आधी गाड्या चोरायचा, मग चोरीच्या गाडीवरुन नागरिकांना लुटायचा, अखेर ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी वाढत असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र दिसते. भररस्त्यात होणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आधी गाड्या चोरायचा, मग चोरीच्या गाडीवरुन नागरिकांना लुटायचा, अखेर 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात
भररस्त्यात नागरिकांना लुटणारा चोरटा गजाआडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 5:08 PM

कल्याण : फिरायला जाणाऱ्या महिलांना टार्गेट करुन लुटणाऱ्या चोरट्याला अखेर मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीवरून मानपाडा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 8 मोटार सायकली, 5 मोबाईल फोन असा एकूण 4,25,000 रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. हा चोरटा आधी परिसरातील गाडी चोरायच्या. त्यानंतर चोरीच्या गाडीवरून सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी येणाऱ्या वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील चैन आणि मोबाईल लंपास करायचा. मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांकडून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. इराणीवर याआधी 21 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, आता याने 13 ठाणे जिल्ह्यात 13 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

मानपाडा पोलिसांची कारवाई

डोंबिवली नांदीवली पूर्व परिसरात 3 तारखेला शरद पुंडलीक कडुकर नावाचा व्यक्ती सकाळी पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या मोटरसायकलस्वारांनी त्यांच्या हातातला मोबाईल खेचून नेला. याप्रकरणी तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीनंतर परिमंडळ 3 कल्याणचे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे यांच्या विविध टीमने आरोपीचा शोध सुरू केला होता.

सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अटक

सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीनुसार पोलिसांनी शहाड रेल्वे स्टेशन परिसरातून मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला खाकीचा धाक दाखवत त्याची विचारपूस केली असता, त्याने ठाणे जिल्ह्यात 13 ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांनी याला ताब्यात घेत याचा दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.